बोरद l प्रतिनिधी
बोरद येथील सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी कोरोना पॉझिटीव्ह आल्याने बँक तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

तळोदा तालुक्यातील बोरद येथे एकमेव असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखाधिकार्यांना कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्याने त्यांनी वेळीच चाचणी करून घेतली. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी एवढ्या ३ ते ४ दिवसांमध्ये जे काही ग्राहक बँकेमध्ये आलेले असतील त्यांनी शाखाधिकारी सोबत चर्चेमध्ये अथवा प्रत्यक्ष सहभाग नोंदवला असेल अशा सर्वांनी आपल्या स्तरावरून आपली चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी बँकेतील ग्राहकांना केले आहे. त्याचबरोबर आपल्या बँकेतील कर्मचार्यांनीही या चाचण्या करून घ्याव्यात असे आवाहन त्यांनी केले आहे.
बोरद गाव ३६ खेड्यांचा संबंध असलेले गाव आहे. बोरद मध्यभागी असल्याने परीसरातील बाजारपेठ केंद्र म्हणूनच ओळखले जाते. त्यामुळे बोरद गावांमध्ये एकमेव असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ग्राहकांची नेहमीच वर्दळ असते अशा ठिकाणी त्याचबँकेचे शाखाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे इतरांची परिस्थिती काय असेल ही तपासणे महत्वाचे आहे.
ग्राहकांचे हित लक्षात घेता आरोग्यवर्धिनी केंद्र त्याचबरोबर राष्ट्रीयीकृत बँक याठिकाणी कोरोनाचा फैलाव झाल्यामुळे पुढील ३ दिवस बंद करण्यात आली आहे.








