नंदुरबार ! प्रतिनिधी
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियाना अंतर्गत शनिमांडळ गटातील व गणातील वावद येथे बैठक संपन्न झाली.
यावेळी शिवसंपर्क अभियानाची सविस्तर माहिती लक्ष्मण पाटील यांनी उपस्थितांना दिली.
गावागावातील समस्या,अडचणी जाणून घेण्यासाठी,दुबार पेरणीचे संकट यासह महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कामाची माहिती व घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयाची माहिती दिली. कर्जमुक्ती योजनेची पार्श्वभूमी उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितली यासह इतर योजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता ‘माझे गाव कोरोनामुक्त गाव’ अभियान राबविण्या संदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी तालुका संघटक जगदीश पाटील,प्रकाश पाटील,सतीश पाटील अविनाश सुतार,प्रवीण पाटील,दीपक कुंभार तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.