बोरद l वार्ताहर
तिसर्या लाटेत अतिशय वेगाने पसरणाऱ्या कोरोना प्रकाराने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. आहे बोरद परिसरातील नागरिकांचे आधार स्तंभ असलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रातील कर्मचारी दि.१४ जानेवारी रोजी ४ तर दि. १५ जानेवारी रोजी २ आणि दि.१६ जानेवारी रोजी परत ४ असे एकूण १० कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत.त्यामध्ये ३ आरोग्य अधिकाऱ्यांचा ही समावेश आहे .तर उर्वरित परिचारिका आहेत.


बोरद तेथील आरोग्यवर्धनी केंद्रातील कर्मचारी एकूण दहा पॉझिटिव्ह निघालेले आहेत. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तसेच परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पाहावयास मिळत आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रामधील आरोग्य कर्मचारीच पॉझिटिव निघाल्याने गावातील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोणा पासून बचावासाठी नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बोरद व परिसरात कोरोना दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे चिंतेत भर पडत आहे बोरद परिसरातील आरोग्य सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच कोरोना ची लागण झाल्यामुळे आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची वानवा भासणार आहे.अशा परिस्थितीत या ठिकाणी तात्पुरते स्वरूपात कर्मचारी उपलब्ध करण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे. कर्मचाऱ्यांना अभावी परिसरातील आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेता.ज्या भागात कोरोना बाधित आढळून आलेले आहेत अशा भागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे बोरद परिसरातील नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन गांभीर्याने करावे व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य वर्धनी केंद्रामार्फत करण्यात येत आहे.








