Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

२०० लॉजेस ५० पार्किंगच्या जागा तपासून स्थानिक गुन्हे शाखेने गुजरात मधुन ५० लाखांच्या कापसाच्या गठाणी तर संशयीत आरोपीस राजस्थान येथून केली अटक

team by team
January 16, 2022
in क्राईम
0
२०० लॉजेस ५० पार्किंगच्या जागा तपासून स्थानिक गुन्हे शाखेने गुजरात मधुन ५० लाखांच्या कापसाच्या गठाणी तर संशयीत आरोपीस राजस्थान येथून केली अटक

नंदरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील कोटेक्स कंपनीत तयार होणार्‍या ५० लांखांच्या कापसाच्या गठाणी सह १५ लाख किमंतीचा ट्रकसह २०० लॉजेस ५० पार्किंगच्या जागा तपासून नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा व उपनगर पोलिसांनी हस्तगत करीत संशयीत आरोपीस अजमेर राजस्थान येथून अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,उपनगर पोलीस ठाणे हद्दीत घुली शिवारात नारायण कोटेक्स या कंपनीत तयार होणार्‍या या कापसाच्या गठाणी या शहादा येथील कापसाचे व्यापारी आशिष फुलचंद गोयल यांना दि. २९ डिसेंबर २०२१ रोजी आमरेली , गुजरात येथील फिदर इंटरनॅशनल यांना ५० लाख रुपये किंमतीच्या १५० गठाणी पाठवायच्या होत्या . त्यासाठी त्यांनी शहादा येथील त्यांचे ओळखीचे ओमसाई ट्रान्सपोर्टचे मनोज चौधरी यांना ट्रक पाठविण्यास सांगितले . दि.३० डिसेंबर २०२१ रोजी मनोज चौधरी यांनी ट्रक (क्र.जी.जे.३२,टी. ९२८१) हा पाठविला . सदर ट्रकचा ड्रायव्हर हा दि.३० डिसेंबर २०२१ रोजी ट्रकमध्ये १५० गठाणी भरुन आमरेली , गुजरात येथील फिदर इंटरनॅशनल येथे पोहोचविण्यासाठी कंपनीतुन दिलेल्या बिलपावती व इतर कागदपत्रे घेऊन निघाला . दि.२ जानेवारी २०२२ रोजी आशिष गोयल यांनी आमरेली येथील फिदर इंटरनॅशनल येथे ट्रक पोहोचला कि नाही याची माहिती घेतली असता सदरचा ट्रक हा तेथे पोहोचला नव्हता . तसेच ट्रकचालकाचा मोबाईल देखील बंद येत होता . मनोज चौधरी यांनी ट्रकच्या मालकाची माहिती काढुन त्यांना संपर्क साधला असता त्यांनी त्यांचा कोणताही ट्रक महाराष्ट्रात पाठविला नसल्याचे व ते महराष्ट्रात येत नसल्याचे सांगितले . श्री . गोयल व मनोज चौधरी यांनी ट्रकची शोधाशोध केली . परंतु ट्रकबाबत काहीच माहीती मिळत नसल्याने व ट्रक ड्रायव्हरचा मोबाईल बंद येत होता . त्यामुळे कोणीतरी ट्रकचा बनावट क्रमांक वापरुन त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांची फसवणूक केली असल्याचे त्यांचे लक्षात आल्याने त्यांनी उपनगर पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरुन भादवि कलम ४०६ प्रमाणे अज्ञात ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला , गुन्ह्याचे गांभिर्य पाहुन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना तपासाबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या . त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व उपनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांची २ तपास पथके तयार करुन गुजरात राज्यातील तसेच महामार्गावरील टोलनाके , आरटीओ चेकपोस्ट इत्यादी ठिकाणी तपास करीत मोरबी येथे पाठविले . मोरबी येथे ट्रक चालकाने वापरलेल्या सिमकार्डचे आधारे तपास केला असता सदर सिमकार्ड हे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ज्या मोबाईल दुकानातुन घेतले त्या मुळ मालकाला शोधून काढले . परंतु त्यांना सदरचे सिमकार्ड कोण वापरत आहे याबाबत काही माहीती सांगता येत नव्हती . त्यामुळे त्या परिसरातील सीसीटीव्ही तसेच गोपनिय बातमीदारामार्फत २ दिवस वेषांतर करुन तपास केला असता त्या संशयीत आरोपीचे नाव उस्मान मोवर असे समजले . त्याच्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व उपनगर पोलिसांनी सखोल माहिती घेतली असता तो अजमेर येथे गेला असल्याचे सांगितले . प्राप्त माहीतीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अजमेर राजस्थान येथे गेले . तसेच उपनगर पोलिसांचे पथक हे मोरबी , गुजरात येथे स्थानिक तपास करीत होते . स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने अजमेर येथे मिळालेल्या जुजबी माहितीचे आधारे तपास सुरु केला . त्यात त्यांनी २०० लॉजेस ५० पार्किंगच्या जागा तपासून संशयिताची माहिती मिळविली . तोपर्यंत संशयित आरोपी उस्मान मोवर याने अजमेर सोडल्याचे समजले . अजमेर येथील दग्यांतील विधी नंतर लोक तेथुन ५० किमी अंतरावर असलेल्या आसवाडा येथील दग्यांलापण जातात . अशी माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आसवाडा या गावी पोहोचले . आसवाडा गावातील दर्ग्याच्या परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वेषांतर करून माहिती घेत होते . त्यादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी गुप्त बातमीदारामार्फत आरोपीकडे असलेल्या गाडीचे वर्णन प्राप्त झाले होते . सदरची माहिती दोन्ही पथकांना दिली . आसवाडा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्राप्त माहितीच्या आधारे संशयित गाडी शोधली असता त्यांना पाकींगमध्ये त्या वर्णनाची गाडी दिसून आली . त्या गाडीजवळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ४ तास दबा धरून होते . संशयीत आरोपी इसम हा गाडीजवळ आला असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्यावर हात टाकला , परंतु आरोपी यास चाहुल लागल्यामुळे तो पळू लागला . त्याचवेळेस स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने अत्यंत चपळाईने हालचाली करुन त्याचा पाठलाग करुन त्यास पकडले . संशयित आरोपी व उस्मान सालेमान मोवर (वय ४५ )रा . मालीया ता . जि . मोरबी या संशयीत आरोपीकडे गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले . त्याने गुन्ह्यातील अपहार केलेल्या कापसाच्या गठाणी या मोरबी येथे ठेवल्याचे सांगितले , तेथे उपनगर पोलीस स्टेशनचे पथक तळ ठोकून होते , त्याना सदरची माहीती दिली असता त्यांनी त्या कापसाच्या गठाणी शोधुन काढल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे आरोपीस अजमेर येथून घेऊन मोरबी येथे पोहोचले . दोन्ही तपास पथकांनी संयुक्त कारवाई करून आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेला रु . १५ लाख किमंतीचा अशोक लेलैंड कंपनीचा (ट्रक क्र . जी.जे.३७,टी. ७५१४) तसेच ५० लाख रुपये किमतीच्या कापसाच्या १५० गठाणी असा एकूण ६५ लाख रु . किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करून वरील गुन्हा उघडकीस आणला आहे . सदरची कारवाई पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाने , पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड , पोलीस हवालदार प्रमोद सोनवणे , कैलास मोरे , पोलीस अमलदार अभय राजपूत , अभिमन्यु गावीत , शोएब शेख , राकेश चौधरी , जयेश बावीस्कर यांचे पथकाने केली असून पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

आरोग्य केंद्राचे १० कर्मचारी कोरोना बाधित, रुग्णालयच करण्यात आले बंद

Next Post

बामखेडा शिवारात अज्ञात माथेफिरूने पपई पिकाचे नुकसान 

Next Post
बामखेडा शिवारात अज्ञात माथेफिरूने पपई पिकाचे नुकसान 

बामखेडा शिवारात अज्ञात माथेफिरूने पपई पिकाचे नुकसान 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add