Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अमळथे येथे विद्युत खांबावरून युवकाचा ७ तासानंतर उतरवला मृतदेह, संतप्त नातेवाईकांचा मृतदेह घेण्यास नकार, आश्वासनानंतर तिढा सुटला

team by team
January 15, 2022
in क्राईम
0
अमळथे येथे विद्युत खांबावरून युवकाचा ७ तासानंतर उतरवला मृतदेह,  संतप्त नातेवाईकांचा मृतदेह घेण्यास नकार, आश्वासनानंतर तिढा सुटला

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील अमळथे येथे विद्युत खांबावर चढलेल्या युवकाचा विद्युत तारांचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान काल दि.१४ जानेवारी रोजी दुपारी ३.१५ वाजेक्या घटनेनंतर पोलिसांच्या उपस्थितीत ७ तासानंतर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास युवकाचा मृतदेह पोल वरून खाली काढण्यात आला.आज सकाळ पासून संतप्त नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार देत जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभे आहेत.दरम्यान रुग्णालयात महावितरण कर्मचारी, खासदार व आमदार चर्चेसाठी दाखल झाले असून १२.३० वाजेपर्यंत त्यांची चर्चा सुरू होती.


सविस्तर वृत्त असे की, अमळथे ता.नंदुरबार येथील तरुण शेतकरी पंकज दरबारसिंग गिरासे ( वय 32) हा ट्रांसफार्मर बसण्याच्या ठिकाणी हजर असताना त्या तरुणास जाधव नामक वायरमनने 11 kv च्या एग्रीकल्चर लाईन फिडरच्या वरती झंपर जोडण्यासाठी खांबावरती चढण्यास विनंती केली.जाधव वायरमन यांनी सांगितले मी महावितरणच्या सबस्टेशनच्या ऑपरेटर कर्मचारी यांना फोन करून लाईट बंद करायला लावलेली आहे.तू बिनधास्त चढ काय घाबरू नको असं म्हणत पंकज याला मुख्य थ्री फेज खांबावरती चढण्यास भाग पाडले.पंकज खांबा वरती चढला व जसा त्याने विद्युत वाहक तारांना स्पर्श करतात तो तारांना चिट कला त्यात त्याचे पूर्ण शरीर काळपट झाले.व त्याच ठिकाणी पंकज या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
ही घटना काल दि.१४ जानेवारी रोजी दुपारी ३.१५ वाजेक्या घटनेनंतर पोलिसांच्या उपस्थितीत ७ तासानंतर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास युवकाचा मृतदेह पोल वरून खाली काढण्यात आला.
जिल्हा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रात्री सदर शेतकरी युवकाचा मृतदेह आणण्यात आला आहे. आज सकाळपासूनच जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात संतप्त नातेवाईक व गावकरी जमा झाले होते.त्यांनी अमळथे येथे विजेच्या खांबावर शेतकऱ्यांचा मृत्यूप्रकरणी. त्याच्या लहान भावाला नोकरी द्यावी. व पन्नास लाख सानुग्रह मदत द्यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. मागणी मान्य होत नाही तो पर्यंत मृतदेह घेणार नाही असा पवित्रा घेतला आहे.जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. त्याठिकाणी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी बोलवण्यात आले असून सदर चर्चेच्या ठिकाणी खा. डॉ.हिना गावित व आ.डॉ.विजयकुमार गावित दाखल झाले त्यानंतर त्यांच्यात चर्चा करण्यात येत आहे.या बैठकीत युवकाच्या कुटुंबीयांना अंत्यविधीसाठी २० हजार रूपये देण्यात आले.तसेच शिक्षणा प्रमाणे नोकरीचे आश्वासन देण्यात आले असून ४ लाखाची भरपाई ही देण्याचे आश्वासन यावेळी वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांनी दिले.त्यानंतर १.३० वाजेच्या सुमारास मृतदेह गावाकडे नेण्यात आला.यावेळी गावकऱ्यांनसह रविंद्र गिरासे. व पचकृशितील नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

‘जिजाऊ ते सावित्री’ उपक्रमात वृषाली खैरनार यांचे कथाकथन

Next Post

विनामास्क व कोविडचे नागरिकांवर गुन्हे दाखल झाल्यास त्यांना चारित्र्य पडताळणी दाखला व पासपोर्ट मिळायला येतील अडचणी: जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील

Next Post
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे विना मास्क फिरणाऱ्या ४६४ जणांवर,१२ व्यवसायीकांविरुध्द् , रात्री दुकाने उघडे ठेवणाऱ्या ५ जणांवर गुन्हे दाखल

विनामास्क व कोविडचे नागरिकांवर गुन्हे दाखल झाल्यास त्यांना चारित्र्य पडताळणी दाखला व पासपोर्ट मिळायला येतील अडचणी: जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add