नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील अमळथे येथे विद्युत खांबावर चढलेल्या युवकाचा विद्युत तारांचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान ट्रांसफार्मर बसवण्यात येत असताना एका वायरमन च्या सांगण्याने तो पोल वर चढला असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान या युवकाचा मृतदेह चार तास विद्युत पोल वर लटकलेल्या अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे की, अमळथे ता.नंदुरबार येथील तरुण शेतकरी पंकज दरबारसिंग गिरासे ( वय 32) हा ट्रांसफार्मर बसण्याच्या ठिकाणी हजर असताना त्या तरुणास जाधव नामक वायरमनने 11 kv च्या एग्रीकल्चर लाईन फिडरच्या वरती झंपर जोडण्यासाठी खांबावरती चढण्यास विनंती केली.जाधव वायरमन यांनी सांगितले की मी या खांबा वरती चढू शकत नाही.तु या खांबा वरती चढून जंपर जोडून दे पंकज ने नकार देत सांगितले की, लाईट चालू असेल मी चढत नाही त्यावर जाधव यांनी सांगितले की मी परमिट घेतलेले आहे व मी महावितरणच्या सबस्टेशनच्या ऑपरेटर कर्मचारी यांना फोन करून लाईट बंद करायला लावलेली आहे.तू बिनधास्त चढ काय घाबरू नको असं म्हणत पंकज याला मुख्य थ्री फेज खांबावरती चढण्यास भाग पाडले.पंकज खांबा वरती चढला व जसा त्याने विद्युत वाहक तारांना स्पर्श करतात तो तारांना चिट कला त्यात त्याचे पूर्ण शरीर काळपट झाले.व त्याच ठिकाणी पंकज या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला.या ठिकाणी प्रश्न असा उभा राहतो की जाधव नामक वायरमन ने परमिट घेतले होते तर लाईट का बंद करण्यात आली नाही? याची सखोल चौकशी होणे गरजेचे व दोषींवर अति कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतप्त जमावाकडून करण्यात येत आहे. पंकज गिरासे हा तरुण शेतकरी परिसरामध्ये सोज्वळ, मृदु,स्वभावाचा होता तो नेहमी अडचणीत मदतीस उभा राहणार होता.त्याचे सर्वांशी सलोख्याचे संबंध होते. व मनमिळावू वृत्तीचा असल्यामुळे पंकजवर प्रेम करणारे लोक घटना घडल्याबरोबर त्या ठिकाणी जमले. पंकज हा अल्पभूधारक शेतकरी होता.पण तो इतर शेतकऱ्यांची शेती अर्ध्या व भाडेपट्ट्याने करत होता.अत्यंत संयमी सोज्वळ मृदू स्वभावाचा गुणी असा तरुण शेतकरी अमळथे गावातून हरपला याचे दुःख परिसरात झाले आहे.लहानपणी वयाच्या 6 वर्ष असताना त्यांचे वडिल दरबारसिंग भोजेसिंग गिरासे यांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले होते.त्याच्या आई प्रमिलाबाई यांनी मोठ्या कष्टाने मोलमजुरी करून त्यांचे संगोपन केले.घरातील कर्ता व मोठा म्हणून पंकज होता.त्याच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे.








