नवापूर l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील वागदी धरणात मासेमारी करणारा व्यक्ती ,जाळ्यात अडकून पडण्याने ,अति थंडीचे वातावरण निर्माण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहतीनुसार, नवापुर तालुक्यातील वागदी धरणात दि. 12 जानेवारी 2022 रोजी ,मासेमारी करून विक्री करणारा भरत होळजु जगताप (वय 45 ) रा.खाटाळ अंबा, ता.साक्री जि .धुळे हा संध्याकाळी 6 वाजे दरम्यान वागदी धरणात मासेमारी करण्यासाठी त्याची विना पासिंग होंडा मोटारसायकल ,धरणा जवळ उभी करून मासेमारी साठी जाळ टाकण्यासाठी धरणात गेला नंतर बाहेर निघाला नाही.म्हणून दुसऱ्या दिवशी वागदी चे सरपंच किसन गावीत यांनी विसरवाडी पोलिस ठाण्यात खबर दिली.क्षणाची वाट न बघता सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, हे.कॉ.राजेश येलवे, पिंटु पावरा ,दारासिंग पावरा,विशाल गावीत,यांनी वागदी येथे धरणा जवळ बघीतले असता त्यांना फक्त मोटारसायकल दिसली परंतु मासेमारी करणारा इसम ला शोधुन हि दिसला नाही ,रात्र झाल्याने सर्व टिम परत आली आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास मासेमारी करणारा इसम जळ्यात अटकुन तरंगताना दिसल्याने ,पोलीस आणि गावकरी च्या सहाय्याने मयत इसमाचे शव अथक परिश्रमा नंतर काढून ,त्याला शवविच्छेदन साठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मृतदेह शवविच्छेदन करुन नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असुन पुढील तपास पोलीस हे,कॉ. अरुण कोकणी विश्वनाथ नाईक करत आहे.








