नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्हयात दि. 12 जानेवारी रोजी 94 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील 19 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
नंदुरबार जिल्हयात दि.12 जानेवारी रोजी कोरोनाने कहर केला असून दिवसभरात 94 कोरोना पॉझिटीव्ह आढळले. यात नंदुरबार तालुक्यात 78 , नवापूर तालुक्यात 15 रुग्णाचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यात सध्या 200 च्यावर कोरोना रुग्ण आहेत.त्यात नंदूरबार तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहेत.दरम्यान दि.12 जानेवारी रोजी जिल्ह्यातील 19 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.त्यात नंदूरबार तालुक्यातील 14 तर शहादा तालुक्यातील 5 रुग्णांचा समावेश आहे.नंदूरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








