तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी वसंत मराठे तर सचिवपदी राजेंद्र मगरे यांची निवड करन्यात आली आहे.

मावळते अध्यक्ष गणेश मराठे यांच्या अध्यक्षतेखाली येथील विश्रामगृहात संघाची बैठक घेण्यात आली या बैठकीत विविध विषयावर चर्चा होऊन नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. अध्यक्ष म्हणून पत्रकार वसंत मराठे, उपाध्यक्ष पदी प्रा.अविनाश माळी, सचिवपदी राजेंद्र मगरे, कोषाध्यक्ष म्हणून प्रा राजेश माळी व सहसचिव पदी गणेश मराठे यांची सर्वनुमते निवड करण्यात आली. यावेळी समाजासाठी विविध विधायक उपक्रम राबविण्याच्या निर्णय घेण्यात आला. बैठकीस रमेशकुमार भट, गुलाबसींग गिरासे, भारतसिंग गिरासे, सुनील मगरे, अक्रम पिंजारी, फुंदीलाल माळी, श्याम सोंनगाडवाला चेतन इंगळे, कल्पेश माळी, व ॲड.सचिन राणे उपस्थित होते.
पत्रकार दिन साजरा
दर्पणकार बालशाश्री जांभेकर यांच्या स्मृतींना उजाळा देऊन पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांनी कोरोना काळात केलेल्या अथक परिश्रमाने त्यांच्या करोना योद्धा म्हणून संघातर्फे गौरव करण्यात आला. त्यांनी प्रशासन , आरोग्य विभाग यांच्या बरोबरच पत्रकारांनीही या महामारीमष्ये समाजात प्रभावी जनजागृती केली होती.








