नंदुरबार | प्रतिनिधी –
नंदुरबार शहरातील बिसमिल्ला चौकात कत्तलीच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या बैलांची सुटका करणार्या पोलीस पथकाशी धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी १० जणांविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , नंदुरबार शहरात विविध परिसरात पोलीस पथक गस्त घालत असतांना बिसमिल्ला चौकात यासिन अरमान कुरेशी याच्या घराच्या बाजुला सात ते आठ बैल बांधलेले दिसुन आले . यापैकी दोन बैलांना निदर्यतेने बांधण्यात आले होते . याबाबत गस्तीवर असणार्या पोलीस पथकातील कर्मचार्यांनी यासिन कुरेशी यास विचारणा केली असता सदर बैल माझ्या मालकीचे असल्याचे त्याने सांगितले . याबाबत पोलीस कर्मचार्यांनी मालकीचे असल्याबाबत पावत्या किंवा परवाना आहे काय ? अशी विचारणा केली असता पावत्या आणुन देता , असे उडवाउडवीची उत्तरे दिली . त्यानंतर सदरचे बैल संयशित असल्याने गोशाळा येथे घेवुन जात असल्याचे सांगितले . यादरम्यान पोलीस निरीक्षक अर्जुन पटले आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले . पोलीस कर्मचार्यांनी दोन बैलांची सुटका करुन गोशाळेत घेवुन जात असतांना यासिन कुरेशी याने आरडाओरड केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे घटनास्थळी दाखल झाले . त्यांनी यासिन कुरेशी यास आरडाओरड न करता पावती आणुन देण्याचे सांगितले . यासिन कुरेशी याने पावती आणुन न दिल्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी बैलाचे दोर काढुन गोशाळेत जमा करण्याचे सांगितले . यावेळी यासिन कुरेशी याच्यासह असलेल्या इतर १० ते १२ लोकांनी आरडाओरड करुन गोंधळ घालण्यास सुरुवात केली व पोलीस वाहन अडवुन पोलीस कर्मचार्यांशी धक्काबुक्की करीत शासकीय कामात अडथळा आणला . म्हणुन पोलीस उपनिरीक्षक प्रदिप सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन यासिन अरमान कुरेशी, मोहसिन यासिन कुरेशी, अनिसाबी यासिन कुरेशी, बानो अरमान कुरेशी, समरिन उर्फ समी मर्दान कुरेशी , आरिफ कुरेशी, गुड्डु उर्फ मजु यासिन कुरेशी , शेख इक्राम शेख आमिन शेख मुसा कुरेशी , शेख नईक शेख जुलकर यांच्यासह तीन ते चार लोकांविरुध्द नंदुरबार पोलीस ठाण्यात भादवी कलम ३५३,१४३,१४७ , १४ ९ , प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीसांनी दोघा बैलांची सुटका करुन गोशाळेत जमा केले आहे .याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे.गुन्ह्याचा पुढील तपास एपीआय मोहिते करीत आहेत .