नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार नगरपालिकेच्या विविध समितीच्या सभापतीची निवड आज पीठासीन अधिकारी प्रांताधिकारी मीनल करणवाळ यांच्या उपस्थित करण्यात आली.नंदुरबार नगरपालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष कुणाल वसावे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे व सर्व नगरसेवक उपस्थित होते. बांधकाम समिती सभापतीपदी अमित रघुवंशी यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी रवींद्र पवार, नंदा जाधव सोनिया राजपूत, दीपक दिघे, जागृती सोनार, भावनाबाई गुरव ,आनंद माळी ,आकाश चौधरी, गौरव चौधरी ,आदींची नेमणूक करण्यात आली.
शिक्षण समिती सभापती पदी राकेश दिलीपकुमार हासानी यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी आशा बालानी, मनिषा वळवी ,सुरेखा मराठे, प्रमोद शेवाळे ,गजेंद्र शिंपी, भावनाबाई गुरव ,रेखा चौधरी, कल्पनाबाई चौधरी, ज्योती राजपूत , यांची नेमणूक करण्यात आली. स्वच्छता वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य सभापतिपदी मेमन मेहरुन्निसा गणी यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी ज्योती पाटील, कुरेशी फहमीदा बानो रियाज, भारती राजपूत, मनीषा वळवी ,जगन्नाथ माळी ,भावनाबाई गुरव, सिंधुबाई माळी, गौरव चौधरी, निलेश पाडवी ,यांची निवड करण्यात आली. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी कैलास पाटील यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी रवींद्र पवार, किरण रघुवंशी, दीपक दिघे, कुरेशी फहमीदाबानो रियाज, भारती राजपूत ,शोभाबाई मोरे ,सिंधुबाई माळी, संगीता वसईकर ,निलेश पाडवी, यांची निवड करण्यात आली. नियोजन व विकास समिती सभापतीपदी कुणाल वसावे याची निवड करण्यात आली तर सदस्यपदी किरण रघुवंशी, प्रमोद शेवाळे ,कसाई रोशन मेहबूब, शेख इम्रान गुलाम रसूल, आरिफसाब कमरसाब शेख, हर्षा बाफना ,यांची नेमणूक करण्यात आली.
महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी मंगलाबाई महादू माळी यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी ज्योती पाटील, मनिषा वळवी ,सुरेखा मराठे, सोनिया राजपूत, शारदाबाई ढंढोरे,हर्षा बाफना ,संगीता वसईकर, संगीता सोनवणे, ज्योती राजपूत ,यांची निवड करण्यात आली .स्थायी समिती सभापती पदी नगराध्यक्ष रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी कुणाल वसावे, अमित रघुवंशी ,राकेश हासानी ,मेमन मेहरूनिस्सा गणी, कैलास पाटील, मंगलाबाई माळी , परवेज भाई खान ,यशवर्धन रघुवंशी, प्रशांत चौधरी ,यांची निवड करण्यात आली.








