शहादा | प्रतिनिधी
मित्राला घरी सोडून परत येणार्या दुचाकी दुर्घटनाग्रस्त झाल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे. मयतांमध्ये शहादा येथील तरूणाचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका दुचाकीने सोबत असणार्या एकाला ब्रंद्रीयबड येथे पोहोचविण्यास जात होते. त्याचवेळी खेतीया शहरानजीक आयटीआय भवनजवळ दुचाकीला अपघात झाला. या अपघातात करण रामा पवार (२०) रा.मोहिदा रोड शहादा व दादु चंपालाल पावरा (२५) रा.ब्रंद्रीयबड (ता.पानसेमल) हे जागीच ठार झाले तर अक्षय लोटन पावरा (१८) रा.शहादा याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर शहादा येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. हा अपघात भयानक होता की, दुचाकीचे चाक निखळून पडले.यावेळी घटनेची माहिती मिळताच रूग्णालय परिसरात गर्दी झाली होती. खेतीया पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास चौहाण यांनी घटनास्थळी भेट देवून अपघाताची नोंद केली. दोघा मयतांचे शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दुर्घटनाग्रस्त दुचाकीला पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.