म्हसावद l प्रतिनिधी
सुलतानपूर येथील राजेंद्र लक्ष्मण देसले या युवकाची मुंबई पोलिस मध्ये निवड झाल्याने गावात वाजत गाजत घोड्यावर बसून मिरवणूक काढण्यात आली.यावेळी गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुलतानपूर गावातील नागरिकांनी या युवकाची घरोघरी आरती करण्यात आली.राजेंद्र पाटील हे अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा त्यांचे वडील हे पोंगे वीकण्याचा व्यवसाय करतात.यांमुळे संपुर्ण गावाला याचा सार्थ अभिमान वाटत आहे.त्यामुळे संपुर्ण गावातली तरुणांनी एकत्रित येत त्याची गावातून घोडयावर मिरवणूक काढली.याप्रसंगी.डॉ हर्षल पाटील,निंबा पाटील, मनोहर पवार,विनोद मोरे, विनोद पाटील, रेखाबाई,कोकिळाबाई कापडे, दुर्गा पाटील,मनिषा पवार, कामिनी पाटील,राकेश पवार, संदीप कोळी, कल्पना मोरे, रोहित पवार, स्वामी पाटील, प्रवीण पाटील,अमृत कापडे, अर्जुन दौलत महाले,आदिसह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपास्थित होतें.








