Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ज्वारी खरेदीसाठी शेतकऱ्याकडून 5 हजाराची लाच स्विकारतांना आदिवासी विकास महामंडळाच्या दोघा कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले

team by team
January 7, 2022
in क्राईम
0
ज्वारी खरेदीसाठी शेतकऱ्याकडून 5 हजाराची लाच स्विकारतांना आदिवासी विकास महामंडळाच्या दोघा कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे ज्वारी खरेदीसाठी शेतकऱ्याकडून 5 हजाराची लाच स्विकारतांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे कर्मचारी कनिष्ठ सहायक व चौकीदार यांनानंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले .

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील मुळ तक्रारदार हे शेती व्यवसाय करतात . तक्रारदार यांची करणखेडा गाव शिवारात नंदुरबार रस्त्यावर गट नं २७ व ११२ मध्ये ३० एकर शेत जमिन आहे . सदर शेती तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावावर आहे . सन २०२१ मध्ये दिवाळीच्या सुमारास निघालेली अंदाजे २०० क्विंटल ज्वारी त्यांच्या करणखेडा येथील त्यांचे गोडावून मध्ये ठेवलेली आहे . सदर ज्वारी खराब असल्याचे सांगून तुझी ज्वारी तु विकू शकत नाही , असे नंदुरबार येथील महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे कर्मचारी कनिष्ठ सहायक अजय किका पाडवी आणि चौकीदार रामसिंग प्रतापसिंग गिरासे यांनी सांगितले व तुला जर ज्वारी विकायची असेल तर प्रति क्विल २०० रूपये प्रमाणे द्यावे लागतील , अशी मागणी केली . तडजोडीअंती प्रती क्विंटल ५० रूपये लागतील अशी मागणी केली . ती ५ हजार रु लाचेची रक्कम आज दि. ७ जानेवारी २०२२ रोजी टोकरतलाव ता . जि . नंदुरबार येथील धान्य गोदामात स्विकारली . त्यावेळी पंचसाक्षीदारां समक्ष रंगेहाथ पकडण्यात आले . ही कामगिरी पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी , पोलीस निरीक्षक , समाधान महादु वाघ , पोलिस हवालदार उत्तम महाजन , विजय ठाकरे , विलास पाटील , पोलिसनाईक अमोल मराठे , चिले , महाले या पथकाने केली .कोणत्याही शासकीय , निमशासकीय कार्यालयांमध्ये कोणी अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने इतर खाजगी इसम लाच करप्शन ब्युसे , नंदुरबार कार्यालयाशी दूरध्वनी नंबर ( ०२५६४ ) २३००० ९ , मोबाईल नंबर . ८८८८८०५१०० व टोल फ्री क्र . १०६४ वर संपर्क साधावा , असे आवाहन पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो , नंदुरबार यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यातील आज आढळले 18 कोरोना रुग्ण

Next Post

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे खून प्रकरणात आरोपीची जामिनावर मुक्तताचे आदेश

Next Post
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे खून प्रकरणात आरोपीची जामिनावर मुक्तताचे आदेश

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे खून प्रकरणात आरोपीची जामिनावर मुक्तताचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add