Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार तालुक्यात बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांनी तपासणी व चाचणी करून घ्यावी : तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिले निर्देश

team by team
January 6, 2022
in आरोग्य
0
नंदूरबार तालुक्यात बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांनी तपासणी व चाचणी करून घ्यावी : तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिले निर्देश

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश कोविड रुग्ण हे नंदुरबारच्या शहरी भागातील असून मोठ्या शहरांमधे वेगवेगळ्या कारणांनी जाऊन आलेल्या प्रवासी नागरिकांमुळे प्रसार वाढत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे . यामुळे बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांनी तपासणी व चाचणी करून घ्यावी असे निर्देश तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिले आहेत.
नंदुरबार तालुक्यातील व शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश रुग्ण हे नंदुरबारच्या शहरी भागात आहेत.रुग्णांची संपर्कातील व्यक्तींची यादी आणि पत्ते यांचे अवलोकन केले असता सदर रुग्ण यांचा प्रवासाचा इतिहास असल्याचे स्पष्ट होत आहे.कुणी संघटनेच्या अधिवेशनासाठी हैदराबादला, कुणी व्यवसायासाठी मुंबईला, कुणी शासकीय कामासाठी पुणे‌ भिवंडीला, कोणी पर्यटनासाठी सापुतारा‌ गोवा, कुणी खरेदीसाठी सुरत आणि धार्मिक कार्यासाठी तिरुपती व शिर्डी असा प्रवास केल्याची आणि तिथे वास्तव्य केल्याचे दिसून येते. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांनी तातडीने जिल्हा रुग्णालय येथे टेस्टिंग करून घ्यावे.असे नंदूरबार येथे तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत निर्देश तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिले.यावेळी ते पुढे म्हणाले की,
दैनंदिन व्यवहारात सर्व नागरिकांनी कोरोना सुसंगत आचरणाचे पालन करावे.जिल्हाधिकारी नंदुरबार यांचे आदेशानुसार विना मास्क आढळून येणाऱ्या नागरिकांवर पोलीस, महसूल तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अधिकारी यांनी दंडनीय कारवाई करण्याची सूचित केलेले आहे तसेच फौजदारी कारवाई देखील करण्याची सुध्दा तरतुद आहे.
सामाजिक अंतर ठेवण्यात यावे ,विशेषतः व्यापारी आस्थापना ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गरजेचे असते अशा ठिकाणी दुकानांचे मालक यांनी व्यवस्थित आखणी करून ग्राहकांना दूर अंतरावर उभे राहण्यास सूचित करावे.
वेळोवेळी हात धुणे आणि सॅनेटायझरचा वापर नागरिकांनी करावा. लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिक यांनी शक्यतो घराबाहेर पडू नये,
तसेच सर्व जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी आपल्या नजीकच्या दुकानास प्राधान्य द्यावे. निवडक खरेदीसाठी विशिष्ट बाजारपेठेत गर्दी होऊन कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने होऊ शकतो.
लसीकरण माध्यमातून कोरोनावर मात करणे शक्य आहे, पंधरा वर्षे वरील सर्व मुला मुलींचे लसीकरणासाठी तालुकास्तरीय नियोजन झाले आहे असे निश्चित दिनांकास संबंधित शाळेतील सर्व पात्र मुला मुलींचे लसीकरण करण्यात येणार आहे, याबाबत दि. ३ जानेवारी रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालयांचे मुख्याध्यापक प्राचार्य यांची बैठक घेऊन सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत असेही तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी म्हटले आहे .तहसीलदार, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी हे तालुकास्तरीय अधिकारी हे सर्व आपापसांत समन्वयाने कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर उभारणीसाठी नियोजन व अंमलबजावणी तसेच नियंत्रण व देखरेख ठेवून आहेत.सर्व जनतेने नियमांचे पालन करावे व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस अभिवादन करीत केला ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान

Next Post

नंदूरबार येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी कुणाल वसावे, उपनगराध्यक्षांच्या निवडीवर आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add