Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी कुणाल वसावे, उपनगराध्यक्षांच्या निवडीवर आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

team by team
January 6, 2022
in राजकीय
0
नंदूरबार येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी कुणाल वसावे, उपनगराध्यक्षांच्या निवडीवर आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

नंदुरबार | प्रतिनिधी-

नंदूरबार येथील उपनगराध्यक्षपदी कुणाल वसावे तर स्विकृत नगरसेवकपदी गजेंद्र शिंपी, शेख आरिफ कमर, जगन्नाथ लोटन माळी व सौ.ज्योती योगेश राजपूत यांची निवड करण्यात आली आहे.
नंदूरबार येथील नगरपालिकेत सर्व सदस्यांना संधी मिळावी यासाठी दरवर्षी विषय समिती सभापती व उपनगराध्यक्ष तसेच स्विकृत सदस्यांची निवड करण्यात येते. त्यानुसार विद्यमान उपनगराध्यक्ष व स्विकृत सदस्यांचा एका वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे निवड प्रक्रिया राबविण्यात आली. उपनगराध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसतर्फे कुणाल बटेसिंग वसावे तर भाजपातर्फे प्रशांत कन्हैय्यालाल चौधरी यांचे नामांकन दाखल करण्यात आले होते. दरम्यान, कुणाल वसावे हे स्थायी समितीमध्ये सदस्य असल्यामुळे त्यांची उपनगराध्यक्षपदावर निवड होवू शकत नाही, याबाबत विरोधी प्रशांत चौधरी यांनी हरकत घेतली. सदर प्रक्रिया सुरु असतांना भाजपाच्या एका सदस्याने अपशब्द वापरल्याच्या कारणावरुन वातावरणात तणाव निर्माण झाला होता. मात्र, संबंधीत सदस्याने माफी मागताच हा वाद निवळला. यावेळी हात उंचावून मतदान प्रक्रिया घेण्यात आली. त्यात कॉंग्रेसचे कुणाल वसावे हे बहुमताने विजयी झाले.
दरम्यान, स्विकृत नगरसेवक पदासाठी कॉंग्रेसचे तीन तर भाजपाच्या एका सदस्याने नामांकन दाखल केले होते. यात कॉंग्रेसकडून गजेंद्र लक्ष्मण शिंपी, शेख आरिफ कमर, जगन्नाथ लोटन माळी तर भाजपाकडून सौ.ज्योती योगेश राजपूत यांचे एकमेव नामांकन दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पालिकेबाहेर मोठया प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. निवडीनंतर फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. तसेच निवडलेल्या सदस्यांची नगरपालिकेपासून आमदार कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
दरम्यान, भाजपाचे प्रतोद ॲड.चारुदत्त कळवणकर यांनी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे यांच्या निवडीबाबत हरकत घेतली असून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कुणाल वसावे हे विद्यमान स्थायी समिती सदस्य आहेत. उपाध्यक्ष हा कायद्याप्रमाणे स्थायी समितीत पदसिद्ध सदस्य म्हणून नगरपालिका अधिनियमानुसार सदस्य होत असतांना एक व्यक्ती दोनदा सदस्य होणे, तसेच उपाध्यक्ष हा कायद्याप्रमाणे नियोजन समितीचा अध्यक्ष असतो. त्या अनुषंगाने स्थायी समिती सदस्य हा इतर सभेतील अध्यक्ष किंवा सदस्य होवू शकत नसल्याने त्यांचा अर्ज अपात्र करावा. अशाप्रकारे कायदेशीरित्या हरकत घेतली. मात्र, पिठासीन अधिकार्‍यांनी या हरकतीबाबत कुठलाही निर्णय न घेता उपाध्यक्ष निवडणूक घेवून महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमाचा भंग केला आहे. म्हणून कुणाल वसावे यांची उपाध्यक्षपदी झालेली निवड रद्द करण्यात यावी, अशी मागणी ऍड.कळवणकर यांनी केली आहे. निवेदनावर प्रशांत चौधरी, गौरव चौधरी, आकाश चौधरी, आनंदा माळी यांच्या सहया आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार तालुक्यात बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांनी तपासणी व चाचणी करून घ्यावी : तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिले निर्देश

Next Post

सावधान : या चार तालुक्यात आज आढळले 12 कोरोना रुग्ण

Next Post
नंदूरबार जिल्हयात आज आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह

सावधान : या चार तालुक्यात आज आढळले 12 कोरोना रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add