नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात १७४ कैदी असून , या ठिकाणी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.मागील आठवड्यात १७४ कैद्यांचे लसिकरण करण्यात आले असुन. या ठिकणी कैद्यांमधील सकारात्मक मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्या काही दिवसांपासून परसबाग फुलविण्यात आली असून, त्यातून विविध फळभाज्या व पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जात आहे .
नंदुरबारात जिल्हा मध्यवर्ती कारागृह साक्री रस्त्यावर आहे . या ठिकाणी अंडर ट्रायलचे १७४ कैदी आहेत . या कैद्याचे मनोबल वाढविण्यासाठी विविध उपक्रम घेतले जात आहेत . कैद्यांच्या इच्छेनुसार त्यांच्याकडून परसबागेत काम करवून घेतले जात असते . हौस असलेले कैदी या ठिकाणी श्रमदान करतात . त्यातील काही शेतीविषयी जाणकार असल्याने त्यांच्या माध्यमातून विविध फळभाज्या व पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जात आहे . त्यांचा उपयोग स्थानिक ठिकाणीच केला जात असल्याचे चित्र आहे .कारागृहाचा परिसर मोठा आहे . त्यामुळे या ठिकाणी शेती करण्यास वाव आहे . ही बाब लक्षात घेता परसबागेत पालक , मुळा , मेथी , आंबटचुका , डेमसे , भेंडी , वांगी , आदी लागवड करण्यात आली आहे . कामाची आवड असलेले कैदी दररोज श्रमदान करून या भाजीपाला पिकाची निगा राखतात . त्यांनाच हा सकस आहार कामी येत असतो . दररोज सकाळी योगा केला जातो . आवड असलेले बहुतेक सर्वच जण यात सहभागी होतात . याशिवाय सामूहिक प्रार्थना देखील केली जाते . स्वच्छता व आरोग्याची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी विशेष दक्षता घेतली जाते .
नुकतेच जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमीक आरोग्य केंद्रातील आरोग्य पथक कारागृहात येवुन १७४ कैद्यांना कोविशिल्डचा पहिला डोस दिला.यासह कारागृहातील २० कर्मचार्यांच्या कुटुबियांचेही यावेळी लसिकरण करण्यात आले.
आरोग्यासाठी कारागृह कर्मचार्यांसह स्वत : कैदीदेखील प्रयत्नशील राहत आहेत . जिल्हा कारागृहात अंडर ट्रायलचे कैदी आहेत . त्यांचे विविध माध्यमातून समुपदेशन केले जाते . त्यासाठी अशा कैद्यांचाही स्वयंस्फूर्तीने सहभाग असतो . ज्यांना शेतीकामाची आवड आहे , ते स्वत : श्रमदान करून विविध भाजीपाला पिकवत आहे . तोच भाजीपाला त्यांच्या दैनंदिन आहारासाठी कामी येत आहे . सेंद्रिय पद्धतीने हा भाजीपाला पिकविला जात आहे .
जिल्हा कारागृहात अंडर ट्रायलचे कैदी आहेत . त्यांचे विविध माध्यमातून समुपदेशन केले जाते . त्यासाठी अशा कैद्यांचाही स्वयंस्फूर्तीने सहभाग असतो . ज्यांना शेतीकामाची आवड आहे . ते स्वत : श्रमदान करून विविध भाजीपाला पिकवला जातो.भाजीपाला त्यांच्या दैनंदिन आहारासाठी कामी येत आहे . सेंद्रिय पद्धतीने हा भाजीपाला पिकविला जात आहे .यासोबतच त्यांची आरोग्याची काळजीही घेतली जात आहे अशी माहिती जिल्हा कारागृह अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी दिली आहे.