नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हॉटेल खेतेश्वर समोर जुन्या सीमा तपासणी नाक्यावर उभ्या असलेल्या ट्रकला सुरत कडुन धुळेकडे जाणाऱ्या इंडिका कारणे धडक दिल्याने हा अपघात झाला अपघातात इंडिका कारमधील दोन व्यक्ती गंभीर जखमी असून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सविस्तर वृत्त असे की नवापूर शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर हॉटेल खेतेश्वर जवळ वळणावर ट्रक उभा होता चालक व क्लिनर चहा घेण्यासाठी थांबले होते रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रक ( क्र.डी.एन. 09, एस. 9012) ला सुरत कडुन धुळे च्या दिशेने जाणारी इंडिका कार (क्र. जी.जे. 16, ए.पी.6932) ने जोरदार धडक दिली.या अपघातात इंडिका कार मधील नागपूर येथील रहिवासी भरत गिरी व कलकत्ता येथील रहिवासी राज चौधरी हे दोघेही गंभीर जखमी झाले त्यांना 108 रुग्णवाहिका येणे नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.परंतु प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पुढील तपास नवापूर पोलिस करीत आहे.








