Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा खाजगी प्राथमिक शाळेसंदर्भात प्रश्न लवकरच मार्गी लागतील : शिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण

team by team
January 5, 2022
in शैक्षणिक
0
नंदुरबार जिल्हा खाजगी प्राथमिक शाळेसंदर्भात प्रश्न लवकरच मार्गी लागतील : शिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण

नंदूरबार l प्रतिनिधी

आपण कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना ते काम जर सकारात्मक विचारांनी, मनापासून व प्रामाणिकपणे करत असू तर आपल्याला आपण करत असलेल्या कामाची पावती नक्कीच मिळते. विस्ताराधिकारी पदापासून ते जिल्ह्याच्या प्रभारी शिक्षणाधिकारी पदापर्यंतचा माझा प्रवास हा मी केलेल्या चांगल्या कामाचाच एक भाग असून त्यासाठी आजपर्यंत मला जि.प. विभागातील सर्व पदाधिकारी, आधिकरी, आपल्या सारखे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभत गेले म्हणून माझ्या कुठल्याही पदाचा अभिमान न बाळगता  खाजगी प्राथमिक शाळेचे,मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागतील असे मत नंदुरबार जिल्हा खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहविचार सभेप्रसंगी जिल्ह्याचे नवनियुक्त प्रभारी शिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
पुढे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सहविचार सभेतील प्रमुख विषयांवर चर्चा करत मुख्याध्यापक मान्यतेचे प्रलंबीत प्रश्न त्वरित सोडवण्यात येतील, संचमान्यता त्वरितदेण्यात येतील व ऑनलाईन कामाविषयी वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल असे आश्वासीत केले तसेच त्यांनी प्रशासनात केलेल्या उल्लेखनीय कामांचा अनुभव विविध उदाहरणातून  दिलेत. जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा सप्ताह अंतर्गत राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. सप्ताह अंतर्गत महिला शिक्षिकांचा गौरव म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मुख्याध्यापिका सौ.मीनाक्षी भदाने व सौ सुलभा महिरे, सौ.अनिता चौधरी यांचा सत्कार डॉ.युनूस पठाण साहेब यांच्या हस्ते पुस्तकरुपी भेटवस्तू देऊन सर्व उपस्थित महिलांचा गौरव करण्यात आला.
यावेळेस नवनिर्वाचित प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण साहेब यांचाही जिल्हा खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने रोप व पुस्तकरूपी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर सर्व मुख्याध्यापक, शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सूचना, तक्रारी व अडचणी यांचे सामूहिकपणे प्रातिनिधिक स्वरूपात मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी आपल्या मनोगतातून सादरीकरण केले व ते लवकरच मार्गी लागतील अशी आशा व्यक्त केली.
सभेसाठी उपस्थित प्रमुख अतिथी सुनिल गिरी व योगेश रघुवंशी व पी.के.पवार यांनी आपल्या भाषणातून ऑनलाईन कामांविषयी मार्गदर्शन करत सरल डाटा वरील आधार अपलोड व अपडेट बाबतच्या प्रश्नांचे निराकरण केले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, प्रल्हाद राजभोज, जिल्हा खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक संघटनेचे जिल्हाभरातील पदाधिकारी, मुख्याध्यापक, तंत्रस्नेही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रुपेश चौधरी, सूत्रसंचालन मुख्याध्यापक शशीकांत पाटील व आभार जिल्हा संघटनेचे सचिव मनोज गायकवाड यांनी मानले. सहविचार सभेच्या यशस्वितेसाठी उध्दव पटेल, किरण त्रिवेदी, अकील शेख, यशवंत बोरसे, सतीश काटके, राहूल झाल्टे,  मनोज पाटील आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्हयात आज आढळले ९ कोरोना पॉझिटीव्ह, तीन दिवसात आढळले २६ कोरोना रुग्ण

Next Post

उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव इंडिका आदळली, दोघे गंभीर जखमी

Next Post
उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव इंडिका आदळली, दोघे गंभीर जखमी

उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव इंडिका आदळली, दोघे गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add