नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात आज दि.५ जानेवारी रोजी तब्बल ९ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.नंदूरबार जिल्हयात तीन दिवसात २६ कोरोना रुग्ण आढळले आहेत.
नंदूरबार जिल्हयात आज दि.५ जानेवारी रोजी नंदुरबार प्रशासनातर्फे १८८ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.त्यात नंदूरबार शहरातील ९ कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात ३ दिवसात २६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. दि.३ जानेवारी रोजी १३, ४ जानेवारी रोजी ४ तर आज दि.५ जानेवारी रोजी ९
कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








