नंदुरबार ! प्रतिनिधी
शहीद शिरीषकुमार फाउंडेशन भालेर यांच्या वतीने फाउंडेशन च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त 100 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
शहीद शिरीषकुमार फाउंडेशनच्या टीमने मागच्या 1 वर्षापासून कोरोनाच्या काळात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवले. कोरोना बद्दल जनजागृती, गाव निर्जंतुकीकरण,वृक्षलागवड, स्मशानभूमीची साफसफाई इ. अनेक समाजपयोगी कामात फाउंडेशनची टीम नेहमी अग्रेसर असते.
वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून माजी पर्यवेक्षक पी.पी. बागुल,देवा नाना,राजेंद्र पाटील(माजी सैनिक),विनोद बागुल,राजेंद्र बागुल इत्यादी मान्यवर उपस्थित होते
यावेळी रामेश्वर पाटील यांनी शहीद शिरीष कुमार फाउंडेशनच्या कार्याची रूपरेषा मांडली.प्रमुख पाहुण्यांनी प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.पी पी.बागुल यांनी जिद्द इच्छाशक्ती आणि सहकार्य यांच्या जोरावर आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो असे सांगत फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला.
गावातील मान्यवरांनी फाउंडेशन ला मदत व सहकार्य केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाऊंडेशनचे सचिव रामेश्वर पाटील यांनी केले.तसेच उपाध्यक्ष योगेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला सागर आभणे,नितीन बागुल, संदीप पाटील,नितीन पाटील,गणेश बागुल सुमित बागुल,महेश पाटील,विशाल बागुल आदींनी सहकार्य केले.