Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रनाळा प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

team by team
July 14, 2021
in सामाजिक
0
नंदुरबार ! प्रतिनिधी
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प रनाळा अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागासाठी संबंधित गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून 28 जुलै 2021 पर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना नंदुरबार येथे अर्ज मागविण्यात आले आहेत.
गंगापूर क्र.1, टाकलीपाडा, केसरपाडा, भवानीपाडा, चौपाळे क्र.5 येथील अंगणवाडी केंद्रातील  अंगणवाडी सेविका 5 रिक्त पदासाठी तसेच सुतारे, धुळवद, कोठडा, शिरवाडे, सुदरर्दे क्र.2, उमर्दे ब्रु.1, घुली, जांभीपाडा अंगणवाडी केंद्रातील मदतनीसाच्या 8 रिक्तपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी  केवळ त्या गावातील  महिला स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 30 जून 2021 रोजी 21 वर्ष पूर्ण ते 32 वर्षांच्या दरम्यान असावे. अर्जदारास 2 अपत्याचे वर अपत्य नसावे. अंगणवाडी सेविकेसाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण ते उच्चत्तम तर मदतनीस पदासाठी सातवी उत्तीर्ण ते उच्चत्तम अशी आहे.
अर्जदार विधवा असल्यास गट विकास अधिकारी अथवा तहसिलदार यांचा दाखला जोडावा. विधवा व अनाथ उमेदवारास अतिरिक्त 10 गुण देण्यात येतील. सक्षम प्राधिकाऱ्याने वितरीत केलेला जातीचा दाखला, मागासवर्गीय उमेदवारास एससी व एसटी साठी 10 गुण तर व्ही.जे.एन.टी,ओबीसी, एस.बी.सी साठी 5 अतिरिक्त गुण देण्यात येतील. बारावी नंतर अर्जदार पदवीधर, डिएड, बीएड केले असल्यास अतिरिक्त 5 गुण देण्यात येतील. अंगणवाडी सेविका व मदतनीस कामाचा दोन वर्ष व त्यापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असल्यास सक्षम अधिकाऱ्याचा दाखला जोडावा. रिक्त पदांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्यास बदलाबाबत वा भरतीप्रक्रिया स्थगित करण्याबाबतचे अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना राहील. शैक्षणिक पात्रतेसंबंधी व अर्जासोबत जोडलेले सर्व प्रमाणपत्र साक्षांकित केलेले असावे.
विहीत नमुन्यातील अर्ज आणि इतर माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, नंदुरबार येथे संपर्क साधावा असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी साईनाथ वंगारी यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Next Post

नागझिरी येथून अडीच लाखाचे सागवानी लाकूड जप्त

Next Post
नागझिरी येथून अडीच लाखाचे सागवानी लाकूड जप्त

नागझिरी येथून अडीच लाखाचे सागवानी लाकूड जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add