Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

घरकुलातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्नशील : माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

team by team
January 1, 2022
in राजकीय
0
घरकुलातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्नशील : माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील घरांप्रमाणेच घरकुलांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन निवडणुकीपूर्वी दिले होते. त्या आश्वासनांची पूर्तता होत असून, घरकुलातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
जिल्हा रुग्णालय परिसरात असलेल्या घरकुलमध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी उर्दू शाळा चालविण्यात येत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप माजी आ. रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, फारुख मेमन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील, पालिकेचे प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, घरकुलातील पालकांनी त्यांच्या पाल्यांना दररोज शाळेत पाठवावे. शाळेत शासकीय नियमानुसार शालेय पोषण आहाराचे वाटप होईल. नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. मुस्लिम समाजातील मुले एक्सपर्ट आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शाळेतील मुलांना दप्तर व खाऊचे वाटप करण्यात आले.

३ लाख लिटर पाण्याच्या टाकीचे बांधकाम
ते पुढे म्हणाले,घरकुलात शाळेच्या सुविधेसह जमातखाना,६ गाळ्यांचे व्यापारी संकुल व ३ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकीचे बांधकाम करण्यात येत आहे. घरकुल वसाहत ही आपली वास्तू असून, तीचे जतन करणे रहिवाशांचे कर्तव्य आहे.

कमी भाड्यात दुकाने उपलब्ध
परिसरातील नागरिकांना व्यवसायाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी पालिकेच्या माध्यमातून घरकुलात सहा गाळ्यांचे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे. दुकान कमी भाड्यात देण्यात येतील असे रघुवंशी यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील ३४ अमलदारांना पदोन्नती

Next Post

डी. आर. हायस्कूल मध्ये ७५ कोटी सूर्यनमस्कार अभियानाला सुरुवात

Next Post
डी. आर. हायस्कूल मध्ये ७५ कोटी सूर्यनमस्कार अभियानाला सुरुवात

डी. आर. हायस्कूल मध्ये ७५ कोटी सूर्यनमस्कार अभियानाला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add