Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील ३४ अमलदारांना पदोन्नती

team by team
January 1, 2022
in क्राईम
0
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील ३४ अमलदारांना पदोन्नती

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्वीकारल्यानंतर जनतेसाठीच नव्हे तर पोलीस दलातील अमंलदारांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून अत्यंत कमी वेळेत जनतेच्या आणि नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अमंलदारांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे . वर्षानुवर्षे पोलीस दलात परिश्रम करून पोलीस अमंलदार आपल्या पदोन्नतीची वाट पाहत असतात . नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी पदोन्नती देणार्‍या संबंधीत शाखेचे मंत्रालयीन कर्मचार्‍यांना नंदुरबार जिल्ह्यातील पदोन्नतीस सेवाजेष्ठतेनुसार पात्र असलेल्या सर्व पोलीस अमलदारांना पदोन्नती देणेबाबत सूचना दिलेल्या होत्या , त्याबाबतची सर्व कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करून नववर्षाच्या पूर्वसंध्येस ३४ पोलीस हवालदारांना सहा . पोलीस उप निरीक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली .
नववर्षाच्या बंदोबस्तात सर्व अधिकारी व अमंलदार व्यस्त पोलीस हवालदारांना अचानक संध्याकाळी अशी पदोन्नती झाल्याची बातमी मिळाल्याने पोलीस अमंलदारांचा आनंद द्विगुणीत होवून त्यांच्या चेहर्‍यावर हसू फुलले , नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील एकूण ३४ पोलीस हवालदारांना सेवा जेष्ठतेनूसार सहा पोलीस उप निरीक्षक पदोन्नती देऊन नववर्षाची जणू भेटच दिलेली आहे . पोलीस दलात सुमारे ३० ते ३५ वर्ष अथक परिश्रम घेऊन सेवा करणान्या अमंलदारांचा सहा . पोलीस उपनिरीक्षक हा पदोन्नतीचा जवळ – जवळ शेवटचा टप्पा असतो त्यानंतर बहुतेक अमंलदार हे पोलीस दलातुन सेवानिवृत्त होत असतात . पदोन्नती झालेल्या सर्व पोलीस अमंलदारांना नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी पदोन्नती बाबत अभिनंदन करुन नव वर्षाच्या व पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . यात पितांबर रतन पाडवी, राजु जयसिंग जाधव,लक्षमण गजमल कोळी, मुंगज्या जत्र्या पाडवी, हर्षल पंडीत रोकडे, विरसिंग बापू वळवी, गिरधन महारु सोनवणे, पानाजी फत्तु बसावे , फुलसिंग मांजच्या पटले, मुकेश राधीया गावीत, मोहनलाल रेवजी वळवी, विठ्ठल पावरा, राजेंद्र शंकर दाभाडे, राजेश सखाराम ठाकरे, राजेंद्र निळकंट चव्हाण, सुपुड़ रुपसिंग पाडवी, गिरधर भिका माळीच , नरेंद्र करणसिंग वळवी, सुकलाल जतन भिल, राजु देविदास पारोळेकर, वंतु भिकान्या गावीत, युवराज पानसिंग रावताळे, फारुकवेग मोगलबेग मिर्झा, गणेश भिकाजी बसावे, कृष्णा पौलाद पवार, वासुदेव प्रतापसिंग वसावे, सादीक शफिक शेख, प्रदीपसिंग देवनाथसिंग राजपुत, संजय भिमराव मराठे, दिपक नामदेव पाटील , संजय चिंधू पाटील, रविंद्र रमेश पवार, विकास पिरन पवार, मुरारजी आलू वळवी यांना पदोन्नती देण्यात आली.नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेबरोबरच पोलीस अधिकारी व अमलदारांचे देखील अडी – अडचणी व समस्या वेळेवर सोडविल्या जातील तसेच गैर कायदेशीर कृत्य करणान्यांची गय केली जाणार नाही असे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी यावेळी सांगितले .

बातमी शेअर करा
Previous Post

बॅँकेची साडेचार लाखात फसवणूक केल्याप्रकरणी एका विरूध्द गुन्हा

Next Post

घरकुलातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्नशील : माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

Next Post
घरकुलातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्नशील : माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

घरकुलातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्नशील : माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add