नंदुरबार । प्रतिनिधी
शहादा शिरपूर रस्त्यावरील अनरदबारीच्या पुढे वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने माता पुत्र ठार झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी सारंगखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,शहादा शिरपूर रस्त्यावरील अनरदबारीच्या पुढे असलेल्या गोशाळेजवळ अज्ञात वाहचालकाने भरधाव वाहन चालवून मोटारसायकल ( एम.एच. १८ , ए.एस.२२५९ ) जबर धडक दिली.या अपघातात प्रतिभा नंदू रगडे ( ४३ ) व कुणाल नंदू रगडे ( २२ ) रा.शिंगाव, ता . शिरपूर हे माता – पुत्र ठार झाले . याप्रकरणी देविदास प्रल्हाद मराठे यांनी फिर्याद दिल्याने सारंगखेडा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याप्रकरणी पुढील तपास पो नी राजेंद्र शिरसाठ करीत आहेत.








