नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील वळण रस्त्यावरील जागेचा वादातून दादा का ढाबाची तोडफोड करून चार लाख रुपयांचे नुकसान केल्याची घटना घडली . याप्रकरणी चार जणांविरुद्ध नंदूरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील सुरेश चौधरी व सुधाकर मराठे यांच्यात वळण रस्त्यावरील जागेचा वाद आहे . या वादातीत जागेवर चौधरी यांनी दादा का ढाबा सुरू केला आहे . त्यामुळे दोन वर्षांपासून त्यांच्यात धूसफूस सुरू होती . २८ डिसेंबर रोजी मध्यरात्री त्यांच्यात पुन्हा वाद उफळला . सुधाकर सदाशिव मराठे , अर्जून सुधाकर मराठे , भैय्या सुधाकर मराठे व आणखी एकजण अशांनी येऊन ढाब्याची तोडफोड केली . आतील टेबल , खुर्ची , फ्रीज , किचनचे साहित्य , गल्ला , किराणा माल , गॅस सिलिंडर यासह इतर बाबींची नुकसान केले . एकुण चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सुशील चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे . घटना घडल्यावर लागलीच पोलिसांना कळविण्यात आले . पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . तोपर्यंत संशयीत पसार झाले होते . चौधरी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी पुढील तपास फौजदार हेमंत मोहिते करीत आहे .








