नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात आज एकाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे.
आज नंदुरबार प्रशासनातर्फे ९४ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.त्याचा अहवाल आज प्राप्त झाला.यात शहादा शहरातील
आयोध्या नगर येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सध्या नंदूरबार तालुक्यात ३,तळोदा व शहादा येथील प्रत्येकी एक असे जिल्ह्यात ५ कोरोना रुग्ण आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








