Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जात पडताळणीचे रिक्त सहआयुक्त त्वरीत भरावे, अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी संघटनेची मागणी

team by team
July 13, 2021
in सामाजिक
0

नंदुरबार | प्रतिनिधी
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी नंदुरबार येथील रिक्त झालेले सहआयुक्त पद त्वरित भरण्यात यावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी केली आहे.
याबाबत आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, सचिव, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की,  नंदुरबार येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीतील सहआयुक्त भालेकर हे दिनांक ३१ मे २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले असून रिक्त झालेल्या सहआयुक्तपदी त्वरित शासनाने नवीन सहआयुक्तांची नियुक्ती करण्याचे आदेश द्यावेत. सहआयुक्त रिक्त पद त्वरित भरण्यात यावे. कोरोनानंतर आता सुनावण्यांची सुरुवात झालेली आहे. नंदुरबार कमिटीवर कामाचा बोजा असून सहआयुक्त अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार यांचे काम गेल्या तीन वर्षापासून वादग्रस्त राहिलेले आहे. असंख्य बोगस कामे झालेली आहेत. ठाकूर, टोकरेकोळी, तडवी यांना मोठ्या प्रमाणात वैधता प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. आम्ही संघटनेच्या माध्यमातुन असंख्य तक्रारी केल्या. परंतु नंदुरबार कमिटीने त्यावर कार्यवाही केलेली नाही. कमिटीने जातीचा दावा अवैध घोषीत केल्यानंतर त्या उमेदवाराविरोधात गुन्हे दाखल करणे समितीस बंधनकारक असतांना नंदुरबार समितीने एकाही उमेदवारावर आजपर्यंत गुन्हे दाखल केलेली नाही, त्याची सुध्दा चौकशी झाली पाहिजे. नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असून खरे आदिवासी नोकरीपासून वंचित आहे व बोगस कर्मचार्यांना नंदुरबार कमिटीने वैधता प्रमाणपत्र देण्याचा सपाटा लावला आहे. म्हणून कर्तव्यदक्ष अधिकार्यांची नंदुरबार येथे सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात यावी, मागणी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी निवेदनातून केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतकर्‍यांनी खरीप हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करा

Next Post

बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add