Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शाश्वत स्वच्छता अभियाना अंतर्गत ३ दिवसीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यशाळा

team by team
December 29, 2021
in आरोग्य
0
शाश्वत स्वच्छता अभियाना अंतर्गत ३ दिवसीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यशाळा

नंदुरबार l प्रतिनिधि –
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) च्या अभियाना अंतर्गत शाश्वत उघड्यावरील हागणदारी मुक्ती कार्यक्रम अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील एकूण ५० ग्रामपंचायतील सरपंच , ग्रामसेवक व निगराणी समितीच्या सदस्यांसाठी ३ दिवसीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले .
जिल्हा परिषद व पंचायत समिती नंदुरबार, एनईसी फौंडेशन आणि फिनिश सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षणाचे आयोजन तळोदा रोडवरील फिनिश सोसायटीच्या कार्यालयात आयोजन करण्यात आले होते . नंदुरबार तालुक्यात मागील दीड वर्षा पासून फिनिश सोसायटीच्या माध्यमातून शाश्वत स्वच्छता अभियाना अंतर्गत शाश्वत उघड्यावरील हागणदारी मुक्ती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर तीन दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन आणि समारोप नंदुरबार पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश वळवी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गट विकास अधिकारी महेश वळवी यांनी उपस्थिताना शाश्वत स्वच्छतेसाठी मनरेगा, माझी वसुंधरा अशा विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून गावात सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापना संदर्भात नियोजन मार्गदर्शन केले. यावेळी , विस्तार अधिकारी भैयासाहेब निकुंभे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना गावे शाश्वत उघड्यावरील हागणदारी मुक्ती करण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करण्याबाबत मार्गदर्शन केले . प्रशिक्षणात प्रशिक्षक शिवकुमार शर्मा यांनी विविध साधनांचा वापर करत प्रशिक्षणार्थ्यांना स्वच्छ भारत मिशनचा इतिहास आणि उद्देश्य, व्यवहार परिवर्तनाच्या पद्धतींचा अभ्यास, वर्तणूक बदलाच्या पद्धती बाबत मार्गदर्शन केले.


यावेळी सर्व प्रशिक्षनार्थीसाठी ग्राम पंचायत भादवड येथे क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी प्रशिक्षक शिवकुमार शर्मा यांनी पाणी आणि विष्टेचा संबंध (CLTS), अस्वच्छतेमुळे होणारे आजार, शौचालय बांधकामासंदर्भातील तांत्रिक पर्याय, स्व-मूल्यांकन, शाश्वत हागणदारी मुक्तीची गरज इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात नंदुरबार तालुक्यातील एकूण ५० ग्रामपंचायतील सरपंच आणि ग्रामसेवक, प्रकल्प व्यवस्थापक आकांक्षा बोरकर, निलेश जाधव स्वच्छ भारत मिशन कक्षातील गट समन्वयक प्रीतेश पाटील ,अर्जुन कुडवे , ,निशांत गजभिये, संतोष नागरे, अभिजीत मैनदाड , अनिल पवार, आदिसह अंगणवाडी सेविका, युवक आणि ग्रामस्थ प्रशिक्षणासाठी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

आरोग्य सेवा अधिक बळकट करणार : सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

Next Post

भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक, अपघातात वृध्द ठार

Next Post

भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक, अपघातात वृध्द ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add