Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आरोग्य सेवा अधिक बळकट करणार : सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

team by team
December 29, 2021
in आरोग्य
0

नंदूरबार l प्रतिनिधी
राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी सर्व पदभरती,नव्याने इमारतींचा विकास तसेच जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी दर्जाची ३७० पदे भरली जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे,अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली.

विधानपरिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे यांनी राज्यातील आरोग्य विभागाशी संबधित उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना श्री. टोपे बोलत होते.त्यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त जागा भरती प्रक्रिया सुरू आहे.शंभर टक्के रिक्त जागा भरती करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत विशेष तज्ञांच्या ८३३५ जागांपैकी ७९८१ जागांवर भरती करण्यात आली आहे. ३३५७ वैद्यकीय अधिकारी जागा भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी २६११ जागांवर भरती करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर ४६२ जागा पदोन्नतीने भरल्या आहेत. तर ३७० पदांच्या भरतीसाठी राज्य लोकसेवा आयोगाकडे मागणी पत्र पाठवण्यात आले आहे.

२४ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ३०० खाटांची रुग्णालये खासगी सार्वजनिक भागिदारी तत्वावर चालवण्याबाबत त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र प्रत्येक जिल्हा रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.नवीन शासकीय रुग्णालय मंजूर झाल्यास सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात सामंजस्य करार करण्यात येत आहेत, असे श्री.टोपे यांनी लेखी उत्तरात नमुद केले आहे.

लोकसंख्येच्या दृष्टीने आरोग्य विभागाचा सुधारित आकृतीबंध तयार करण्यात येत आहे. राज्यातील आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा विकास कामांसाठी आशिया विकास बँककडून ५१७७ कोटी रुपये तर हुडको कडून ३९९४ कोटी रुपये कर्ज घेतले जाणार आहे. यातून श्रेणीवर्धन करण्यासाठी मान्यता देण्यात आलेल्या संस्थेचे बांधकाम, यंत्रसामग्री उपकरणे खरेदी, मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे श्री. टोपे यांनी सांगितले.

राज्यातील जुन्या आणि दुरुस्ती न होणाऱ्या रुग्णवाहिकांऐवजी नवीन एक हजार रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत. वित्त आयोग निधी, खासदार निधी, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातूनही रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

या लक्षवेधीच्या चर्चेत सर्वश्री प्रविण दरेकर, डॉ.रणजित पाटील, गोपिचंद पडळकर यांनी सहभाग घेतला.

बातमी शेअर करा
Previous Post

पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करून ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी द्या : मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे

Next Post

शाश्वत स्वच्छता अभियाना अंतर्गत ३ दिवसीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यशाळा

Next Post
शाश्वत स्वच्छता अभियाना अंतर्गत ३ दिवसीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यशाळा

शाश्वत स्वच्छता अभियाना अंतर्गत ३ दिवसीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add