Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गल्ली ते दिल्ली प्रवास : दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे इंडियन आयकॉन अवॉर्डने सन्मानित

team by team
December 28, 2021
in राष्ट्रीय
0
गल्ली ते दिल्ली प्रवास : दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे  इंडियन आयकॉन अवॉर्डने सन्मानित

नंदूरबार l प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांना राजधानी दिल्ली येथे नॅशनल हुमन राईट ऑर्गानायझेशन कडून इंडियन आयकॉन अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.

सातपुडा पर्वत रांगेतील अक्कलकुवा तालूक्यातील ‘बालाघाट’ या अतिशय दुर्गम लहान खेड्यातील आदिवासी समाजातील पहिला नवयुवक अनिल वसावे यांने कोरोना काळानंतर युरोपातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एलब्रूस’ सर करून विश्वविक्रम केला होता. कोरोना काळात जगात सुरू झालेल्या पर्वत आरोहण मोहिमेतील अनिल वसावे हा भारतातून गेलेल्या गिर्यारोहकांमधून पहिला आदिवासी समाजाचा प्रतिनिधी ठरला होता.
अनिल वसावे यांनी 2021 मध्ये केलेली ही दुसरी आंतरराष्ट्रीय मोहीम होती. 26 जानेवारी 2021 रोजी ही अनिल वसावे याने आफ्रिका खंडातील माऊंट किलीमांजारो हे शिखर सर केले होते. आता 8 जुलै,2021 मध्ये एकाच वर्षी 2 आंतरराष्ट्रीय मोहिमा अंमलात आणताना युरोपातील सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या टीम चे नेतृत्व ही करायला मिळणे ही खरी तर प्रचंड अभिमानाची गोष्ट होती. याची दखल घेत नॅशनल हुमन राईट ऑर्गानायझेशन कडून दिल्लीतील लीला ॲम्बियन्स हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांचा मान्यवरांच्या हस्ते इंडियन 27 डिसेंबर रोजी आयकॉन अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.यावेळी जलशक्ती प्रोत्साहन कॅबिनेट मंत्री गजेंद्र शेखावत, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय वन, पर्यावरण, युवा क्रीडा मंत्री मामा नटुग आदी मान्यवर उपस्थित होते.येणाऱ्या काळात 7 ही खंडातील 7 सर्वोच्च शिखरे सर करण्याचा मानस आहे, असे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरची खरेदीने ओलांडला सव्वा लाख क्विंटलचा टप्पा

Next Post

शहादा नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे यांची नियुक्ती

Next Post
नंदूरबार शहरात सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या पथकाची कारवाई, बँकेमध्ये असलेल्या वैयक्तिक लॉकरची केली तपासणी

शहादा नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add