नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील प्रेस फोटोग्राफर नितीन पाटील यांना मुंबई येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.

मुंबई येथील ॲपक फोटोग्राफी इन्स्टिट्यूट मार्फत राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आली त्यात वाहन ( व्हेईकल ) या विषयात नितीन पाटील यांना चारा भरून नेणाऱ्या वाहनाच्या फोटोला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले .मुंबई येथील नरिमन पॉईंट परिसरातील फोटो गॅलरीत नुकतेच प्रदर्शन भरण्यात आले त्यात स्पर्धेतील विजेते व निवडक फोटोग्राफरांचे फोटोचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यभरातून फोटोग्राफरांनी फोटो पाठवले आहेत.
श्री. पाटील यांना यापूर्वी फोटोग्राफी स्पर्धेत नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, जळगाव यासह विविध ठिकाणी पारितोषिक मिळाले आहेत. त्यांनी यापूर्वी विविध विषयांवर फोटोग्राफी प्रदर्शन भरविले आहे सारंगखेडा येथील यात्रेत भरविण्यात आलेल्या फोटो प्रदर्शनाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे..
श्री.पाटील यांना मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.








