नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावर दुचाकीने धडक दिल्याने महिला जखमी झाल्याची घटना घडली.याप्रकरणी मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील सोलाबारीपाडा येथील सिपलीबाई अशोक वळवी या मोलगी ते अक्कलकुवा रस्त्याने जात होत्या. यावेळी एका दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ एए १९२७) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात सिपलीबाई वळवी यांना धडक दिल्याने त्या जखमी झाल्या. अपघातानंतर दुचाकी चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत सिपलीबाई वळवी यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८ सह मोटार वाहन कायदा कलम १३४/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना.राजेंद्र गावित करीत आहेत.








