Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बालिकेच्या विनयभंग प्रकरणी नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

team by team
December 24, 2021
in क्राईम
0

नंदूरबार l प्रतिनिधी
विसरवाडी पोलीस स्टेशन हद्यीत सोनपाडा गाव शिवारातील शेतात दादर पिकावर बसलेल्या चिमण्या उडवत असतांना १२ वर्षीय बालिकेचा विनयभंग करणाऱ्या खैरवे ता.नवापुर जि . नंदुरबार येथील आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने ५ वर्ष सश्रम कारावास व रुपये ५ हजाराचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२४ जानेवारी 2020 रोजी सकाळी ८ ते ८.३० वाजेच्या दरम्यान फिर्यादी महिला रा . पालीपाडा ता.नवापुर जि.नंदुरबार या घरी असतांना त्यांच्या चुलत भावाच्या मुलीने फोन करुन शेतात तात्काळ येण्याचे सांगितले होते , म्हणून फिर्यादी या शेतात गेल्या असता त्यांच्या बहीणीची पिडीत मुलगी ही शेतात दादर पिकावरील चिमण्या उडवत होती . तेव्हा तिला एका माणसाने मागुन येऊन तिच्या मनात लज्जा निर्माण होईल व तिला वाईट वाटेल असे घाणेरडे कृत्य करुन तिचा विनंयभंग केला होता . त्यामुळे ती प्रचंड घाबरुन रडायला व आरडाओरडा करायला लागली होती . तेव्हा आजुबाजुच्या शेतातील लोकांनी आरोपीचे ताब्यातुन पिडीत मुलीस सोडवुन त्यास पकडुन ठेवलेले होते . त्यावेळी आरोपी याने त्याचे नाव जयंत एमथा गावीत . रा . खैरवे ता.नवापुर जि . नंदुरबार असे सांगितले . आरोपी याने सदरचे घाणेरडे कृत्य केल्यामुळे विसरवाडी पोलीसांनी तातडीने विनयभंग व पोक्सो कायदयान्वये भा.द.वि.क. ३५४ , बा.लै.अ.का.क. ( पोक्सो ) – ८ व १० अन्वये आरोपीविरुध्द गुन्हा नोंदवुन त्यास तात्काळ सदर गुन्हयात अटक केली होती . सदर खटल्याची सुनावणी राजेश एस . तिवारी , प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांच्या कोर्टात होवुन आरोपी जयंत एमथा गावीत . रा . खैरवे ता.नवापुर जि.नंदुरबार यांच्या विरुध्द सर्व कलमान्वये गुन्हा शाबीत झाल्याने न्यायालयाने सदर आरोपीस ५ वर्ष सश्रम कारावास व रुपये ५ हजाराचा दंडाची शिक्षा सुनावली आहे . सदर गुन्हयाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शिंदे ( सेवा निवृत्त ) यांनी आरोपी विरुध्द सबळ पुरावे प्राप्त करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते . खटल्याचे कामकाज पाहणारे अतिरीक्त जिल्हा सरकारी वकील ॲड . तुषार कापडीया तसेच पैरवी अधिकारी म्हणुन पोहेकॉ नितीन सावळे व पोना गिरीष पाटील यांनी कामकाज केले आहे . तपास अधिकारी व त्यांचे पथक आणि सरकारी वकील यांचे पोलीस अधीक्षक , नंदुरबार श्री . पी . आर . पाटील व अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी अभिनंदन केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

राजस्थान येथे होणाऱ्या आदिवासी महासंमेलनात पारंपरिक पेहराव बंधनकारक, राज्यस्तरीय सभेत आदिवासी एकता परिषदेचा निर्णय

Next Post

नंदूरबार जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू, रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी, सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध

Next Post
राज्यभर वाटप होणार्‍या खावटी अनुदान योजनेत जिल्ह्याच्या ठिकाणीच लाभार्थी वंचीत, प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा ईशारा

नंदूरबार जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू, रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी, सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add