नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील नंदलवड खवल्यापाणी येथे नवऱ्याने दुसरे लग्न केले म्हणून अडीच वर्षीय मुलाला ठार करत आईनेहीही आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील नंदलवड खवल्यापाणी येथील
दितलीबाई दिनेश वळवी (२५ ) या महिलेच्या नवऱ्याचे दुसरे लग्न केले म्हणून स्वताची मनस्थिती खराब करून घेवून त्या मनस्थितीत तिने स्वताच्या अविनाश दिनेश वळवी या अडीच वर्षीय बालकाला गळफास देऊन ठार केले.स्वताचे मुलास दोराच्या सहाय्याने गळफास देवून मारून टाकले व स्वताही गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी पो.नी.दिलीप काशिनाथ महाजन यांच्या फिर्यादीवरून धडगाव पोलीस ठाण्यात दितलीबाई दिनेश वळवी रा . नंदलवड खावल्यापाडा ता . धडगाव ईच्या विरूद्ध भादवी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोसई राहल भदाणे करीत आहेत.








