नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी ते निझर रोडवरील पोदार शाळेपर्यत गतिरोधक बसवण्याची मागणीचे निवेदन भाजपातर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की,नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी पासुन निझररोड वरील हॉटेल साई पॅलेस (हिरा गार्डन) ते पोदार पब्लिक स्कुल दरम्यान असलेल्या चार रस्त्यावर सतत मोठे प्रमाणात अपघात होत आहे. यापुर्वी या चार रस्त्यावर एका शिक्षकाचा अपघात होऊन मृत्यु झाला होता. तर अनेक वेळा छोटे-मोठे अपघात सतत होत असतात. नंदुरबार शहरातुन तळोदा, अक्कलकुवा, धडगांव, निझर-गुजरात या तालुक्यातील नागरीक मोठया प्रमाणात रस्त्यावरुन ये-जा करीत असतात. तसेच हजारो वाळुच्या ट्रका रोज या रस्त्यावरुन वाहतुक करीत असतात. या रस्त्यालगत असलेल्या मन्सुरी मंडल लगत असलेल्या चौफुलीजवळ सतत अपघात होत असतात. शहादातुन येणारी ट्राफीक नळव्याकडे व नवापुर कडे जातांना हा अपघात सातत्याने होतो तसेच पोदार पब्लिक स्कुलचे विदयार्थी देखील शाळा सुटल्यानंतर घरी जाण्याच्या धावपळीत असतात त्यांचा देखील अपघात होऊ शकतो. करीता प्राणहानी टाळयाकरीता त्वरीत गतिरोधक बसवावा ही विनंती. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील,शहराध्यक्ष निलेश माळी, नरेंद्र माळी, निलेश माळी,खुशाल चौधरी आदी उपस्थित होते.








