तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील मोड शिवारात बुधवारी आढळून आलेल्या मृत बिबट्या वर येथील वनविभागाकडून गुरुवारी तेथे शेतातच अंत्य संस्कार करण्यात आले.यावेळी वन
विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.तथापि मयत बिबट्यांच्या सलग दोन घटना घडल्याने वन्य प्राणी प्रेमींनी चिंता व्यक्त केली असून या प्रकरणी वन विभागाने ठोस उपाय योजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तळोदा तालुक्यातील शेतकरी भगवान देवराम शिंदे यांची ऊस तोड सुरू आहे. ऊस तोडीसाठी ऊस तोड कामगार बुधवारी दुपारी गेले होते.त्यांना दुर्गंधी आल्याने थोड्या पुढे मेलेला,कुजलेल्या मृत बिबट्याचे शव आढळून आले होते त्यामुळे त्यांनी वनविभागाला कळविल्या नंतर अधिकारी,कर्मचारी घटना स्थली दाखल होवून कालच पंचनामा केला.त्यानंतर गुरुवारी दुपारी अधिकारी,कर्मचारी पुन्हा तेथे जावून मृत बिबात्यावर अंत्य संस्कार केले.तत्पूर्वी तळोदा येथील पशू वैद्यकीय अधिकारी डॉ विश्वास नवले यांनी मृत बिबट्याचे शव विच्छदन केले होते.यावेळी मेवासी वन कार्यालयाचे उपवन संरक्षक गांगोडे, वन्य जीवरक्षक विवेक देसाई,सागर निकुंबे, वनक्षेत्र पाल निलेश रोडे, वणपाल अर्चना लोहार,वणपल वासुदेव माळी, विरर्सींग पावरा,गिरिधर पावरा,भावना जाधव,एस ओ नाईक, राजा पावरा, एल टी पावरा,आर जे शिरसाठ,नामदेव डोंगरे आदी कर्मचारी उपस्थित होते.








