नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथे आयान साखर कारखान्याने उसाचे 23 कोटी 50 लाख रुपयांचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. एक लाख टन उसाचे हे पेमेंट असेल ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे अशी माहिती कारखान्यातर्फे आज देण्यात आली.
आयान साखर कारखाना महिनाभरापूर्वी सुरू झाला. गाळप सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना या वर्षी उसाला एफआरपीपेक्षा 70 रुपये अधिकचा दर दिला आहे. 2350 रुपये प्रति टन दर घोषित केला आहे. आतापर्यंत खरेदी केलेल्या उसापैकी एक लाख मेट्रिक टनाचे 23 कोटी 50 लाख रुपये पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे.
ऊस वाहतुकीच्या दरात वाढ
आयान शुगरने ऊस वाहतूकदारांच्या वाहतूक दरात 15 टक्के अशी वाढ केली आहे. ही दरवाढ चालू गळीत हंगाम 2021-22 पासून दिली जाणार आहे. ऊस वाहतुकीसाठी मार्केट दरापेक्षा 12 ते 13 रुपये प्रतिलिटर कमी दराने डिझेल उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरीदेखील वाढलेले डिझेल दर आणि मेन्टेन्स खर्च विचारात होता दरवाढ करण्यात आली आहे. बिना ऍडव्हान्स तोडणी वाहतूक यंत्रणा 30 टक्के प्रमाणे कमिशन देण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली.








