नंदुरबार | प्रतिनिधी
नवापूर शहराजवळील धडधडया रेल्वेगेटजवळ, प्रवाशी वाहतुक करणार्या ट्रॅव्हल्सबस चालकाकडून खंडणी मागीतल्याप्रकरणी नगरसेवकासह ११ अनोळखी जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर शहराजवळील धडधड्या रेल्वेगेटजवळ अशपाक खान युसूफ हे त्यांच्या ताब्यातील साईराज सरकार ट्रॅव्हल्स बस (क्र.जी.जे.११-एक्स.०६८८) यामध्ये २८ प्रवासी बसवून जात असतांना रेल्वेगेट बंद असल्यामुळे त्यांनी ट्रॅव्हल्स थांबविली. त्याठिकाणी १० ते १२ अनोळखी इसमांनी मोटरसायकलवर येवून बसच्या पुढे मोटरसायकल लावून बस बेकायदेशीरपणे चालू आहे. त्यामुळे बस जावू देणार नाही. असे सांगत चालकाकडून खंडणीची मागणी केली. ट्रॅव्हल्सचे मालक शाहरूक खाटीक याने त्यांना गावाची गाडी आहे. अशा त्रास देता. नगरसेवक याने शाहरूक खाटीक याचा पोटार चाकू लावला व एका अनोळखी इसमाने शाहरूक खाटीक याच्या खिशातून ५ हजार रूपये लंपास केले तसेच शाहरूक खाटीक यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या मित्राला जिवेठार मारण्याचा उद्देशाने लोखंडी पाईपने मारण्याचा प्रयत्न केला. तसेच एकाने बसच्या काचा फोडल्या. तसेच फिर्यादी यांनाही मारहाण केल्याप्रकरणी अशपाक खान युसूफ रा.कासोदा (ता.एरंडोल जि.जळगाव) यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३८५, ३९५, ३०७, ४२७, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास अशोक मोकट करीत आहेत.








