नंदुरबार l प्रतिनिधी
रेल्वे रुळ दुरुस्तीच्या कामासाठी नंदुरबार ते नवापूर मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग गेट नंबर 69 (नवापूर ते कोळदा ) आणि रेल्वे लेव्हल क्रॉसिंग गेट नंबर 74 सीपीडी यार्ड या मार्गावरील वाहतुक 27 डिसेंबर 2021 सकाळी 7 पासून ते 31 डिसेंबर 2021 रोजी सांयकाळी 7 वाजेपर्यंत बंद करण्यात येणार असल्याचे जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी कळविले आहे.
यामार्गावरील पर्यायी वाहतूक धुळे ते गुजरातकडे जाणारी वाहने धुळे-साक्री-पिंपळनेर-नवापूर मार्ग गुजरातकडे व गुजरात राज्याकडून येणारी वाहने त्याच मार्गाने धुळेकडे जातील. तर गुजरात राज्याकडून नंदुरबारकडे येणारी वाहने गुजरात राज्यातून साकरदा रेल्वे लेव्हल क्रॉसींग गेट क्रमांक 65 वरुन उच्च्छल-धानोरामार्गे नंदुरबारकडे व नंदुरबारकडून गुजरात राज्याकडे जाणारी वाहने त्याच मार्गे जातील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.








