तळोदा l प्रतिनिधी
विद्यापीठाचां स्वायतेवर घाला घालणारे निर्णय तत्काळ रद्द करावे अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेणे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या बाबत जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. असून त्यात म्हटले आहे की, कुल्पतींच्या अधिकारात हस्तक्षेप करून राज्य शासनाने ठरवलेल्या दोन नावांमधून विद्यापीठाच्या प्रभारी कुलपती म्हणून नाव उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांची निवड करावी असा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यास कायदेशीर स्वरूप देण्यात येणार आहे.परंतु या निर्णयामुळे राजकीय हस्तक्षेप वाढणार असून त्याचा विपरीत परिणाम विद्यापीठांच्या स्वयत्तेवर होणार आहे.कारण कुलपती हे सर्व विद्यापीठांचे प्रमुख आहार त्यांचा अधिकारावर एक प्रकारे अक्रमणच आहे.शिवाय या निर्णयामुळे सर्व गुवत्ताधरक, विद्यार्थी,प्राध्यापक यांच्यावरही विपरीत परिणाम होवू शकतो.प्रत्येक निर्णयाबाबत राज्य शासनावर अवलंबून राहवे लागणार आहे .परिणामी विद्यापीठांचे गुवतापूर्न शिक्षनाचे राजकीय कारण होईल त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करावा,अशी मागनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक प्रेम माळी,शहर मंत्री जयेश सोनवणे,कार्यालय मंत्री आशिष भूरट यांनी केली आहे.








