म्हसावद l प्रतिनिधी
पशुधन विकास पशुवैद्यकीय दवाखाना अंबापूर व बायफ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ए.एस.के. फाऊंडेशन समृद्ध किसान कार्यक्रम अंतर्गत साबलापाणी ता.शहादा येथे पशुधन सर्व चिक्कीत्सा मोहीम व लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये लाळया खुरकत -४०० जनावरे ,गायी व म्हशी तसेच ३६० शेळ्यांना जंत निर्मूलनाचे औषध देण्यात आले, २५ गायींची गर्भातपासणी, २० गायी म्हशींची वंध्यत्व तपासणी ,२० जनावरांचे खच्चीकरण , ४ कृत्रिम रेतन असे एकूण ८२९ जनावरांना उपचार करण्यात आला .यासाठी डॉ. वासुदेव पावरा-पशुधन विकास अधिकारी, डॉ.व्ही.बी.सामुद्रे पशुधन पर्यवेक्षक, डॉ. हिम्मत पावरा-पशुधन पर्यवेक्षक पाडळदा, बायफ संस्थेचे विभागीय प्रमुख लिलेश नाटेश्वर चव्हाण उपस्थित होते.डाॅ.पावरा यांनी अंबापूर,साबलापाणी येथील पशूपालकांना साथीच्या आजाराबाबत सांगून काळजी काय घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गणेश पाटील, संजय पावरा, देवेंद्र पाटील रोहित मालचे, अनिल पावरा, गोविंद पावरा रोहित निकम, तेर्सिंग पावरा रामचंद्र भंडारी , फेंदा पावरा व ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले.








