नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील आयान शुगर ने गेल्या दहा वर्षापासून उसाला एकरकमी आणि चांगला दर दिला आहे. मागील हंगामात देखील एफ आर पी पेक्षा 98 रुपये आणि यावर्षी 70 रुपये अधिकचा दर दिला आहे.या वर्षी दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति टन दर घोषित केला आहे अशी माहिती आयान शुगरतर्फे जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना देण्यात आली.
जिल्ह्यात तीन साखर कारखाने आहेत. या कारखान्यांनी आपले दर जाहिर केले आहेत कारखान्यांनी घोषित केलेले ऊस दर कमी आहे म्हणून शेतकऱ्यांनी दर वाढवून देण्याची मागणी मा.जिल्हाधिकारीे यांचेकडे केली. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात आयान शुगर च्या अधिकाऱ्यांनी म्हणणे मांडले. अधिकाऱ्यांनी सांगितले, आयान शुगरचा नोव्हेंबर 2021 पासून गाळप हंगाम सुरू करण्यात आला. आज पर्यंतचा सरासरी साखर उतारा 8.38 आहे. मागील गळीत हंगाम 2020 21 मध्ये निव्वळ एफआरपी 2327 रुपये असताना कारखान्याने 98 रुपये अधिकचा दर अर्थात 2425 रुपये प्रति टन दर दिला आहे. गाळप क्षमता वाढ मुळे कारखाना 60 दिवस उशिरा सुरू झाला शेतकरी आमचेसाठी थांबले होते शेतकरी बंधुचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी कारखान्याने तोटा सहन करून 98 रुपये प्रति टन अधिक दर दिला. चालू हंगामाची एफआरपी 2280 रुपये प्रतिटन असताना देखील 2350 रुपये दर दिला असून तो एफ आर पी पेक्षा 70 रुपये अधिक आहे.
कारखाना सुरू होऊन चाळीस पन्नास दिवस झाले आहेत साखर उतारा 8. 38 टक्के इतका अत्यल्प आहे साखर उतारा चांगला राहिल्यास ऊस दर देणे शक्य होईल.
ऊस उत्पादकांनी परिपक्व ऊस कारखान्यात द्यावा. ऊस लागवड केल्यानंतर लगेचच नोंद करावी.जेणे करून तोडणीचे योग्य नियोजन करणे शक्य होते. चांगल्या रिकवरीच्या ऊसाची लागवड करणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस कारखाने कमी दिवस चालण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झाली पाहिजे ऊस लागवड वाढण्यासाठी आम्ही देखील प्रयत्न करत आहोत.
आयान कारखान्याने 2011 पासून नेहमी चांगला आणि एक रकमी ऊस दर दिला आहे. नजीकच्या काळात कोजन, डिस्टलरीसारखे प्रकल्प चालू झाल्यास यापेक्षा अधिकचा दर देण्याचा मानस आहे.








