Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे भाजपाचा प्रांताधिकारी कार्यलयावर मोर्चा, अतिक्रमितधारक शेतकर्‍यांना अपात्रतेच्या बजावलेल्या नोटीसा मागे घेवून पुन्हा पडताळणी करण्याचे ठोस आश्वासनानंतर मोर्चेकरी फिरले माघारी

team by team
December 21, 2021
in कृषी
0
तळोदा येथे भाजपाचा प्रांताधिकारी कार्यलयावर मोर्चा, अतिक्रमितधारक शेतकर्‍यांना अपात्रतेच्या बजावलेल्या नोटीसा मागे घेवून पुन्हा पडताळणी करण्याचे ठोस आश्वासनानंतर मोर्चेकरी फिरले माघारी

तळोदा | प्रतिनिधी
नियमानुसार संपूर्ण कागद पत्रांची पूर्तता केलेली असतांना प्रशासनाकडून साधारण ६०० वन दावे अपात्र ठरविण्यात आल्याचा निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी सकाळी तळोदा येथील उपविभागीय कार्यालयावर वन अतिक्रमण धारक शेतकर्‍यांच्या धडक मोर्चा काढण्यात आला.यावेळी मोर्चेकर्‍यांनी मोठ्या घोषणा दिल्या.मोर्चा प्रशासकीय इमारतीत धडकल्या नंतर सहाय्यक जिल्ह्याधीकारी डॉ.मैनेक घोष व तहसीलदार गिरीश वाखारे यांनी निवेदन स्वीकारून या अतिक्रमितधारक शेतकर्‍यांना अपात्र बाबत बजावलेल्या नोटिसा मागे घेवून पुन्हा कागद पत्रांची संधी देवून पडताळणी करण्याचे ठोस आश्वासन दिल्याने शेतकर्‍यांनी मोर्चा मागे घेतला.

तळोदा,अक्कलकुवा तालुक्यातील साधारण साडेतीन हजार शेतकर्‍यांनी आपल्या विविध वन जमीन समिती मार्फत तळोदा येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वन हक्क दावे मंजुरी करिता दाखल केले होते. त्यापैकी दोन हजार ९०० दावे मजूर करण्यात आले होते.उर्वरीत सहाशे दावे या अतिक्रमण धारकांनी शासनाने ठरवून दिलेल्या वेगवेगळ्या कागद पत्रांची पूर्तता न केल्यामुळे अपात्र ठरविण्यात आली आहेत.अशा शेतकर्‍यांना गेल्या महिन्यात उपविभागीय अधिकार्‍यांनी नोटिसा बजावून जिल्हा स्तरीय वन समितीकडे अपील दाखल करण्याची सूचना दिली होती.वास्तविक शासनाच्या नियमनुसार वन हक्क दाव्यासाठी या शेतकर्‍यांनी संपूर्ण कागद पत्रांची पूर्तता केली होती असे असतांना दावे अपात्र ठरविण्यात आल्याचे अतिक्रमण धारक शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.या दाव्यांवर पुन्हा तातडीने नवीन कार्यवाही व्हावी. यासाठी आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्यावतीने वनजमीन अतिक्रमण धारकांचा मोर्चा तळोदा येथील उपविभागीय कार्यालयावर काढण्यात आला.मोर्चाची सुरुवात आमदार कार्यालयापासून होवून बस स्थानक ,तहसीलरोड मार्गे प्रशासकीय इमारतीत धडकला.यावेळी शेतकर्‍यांनी प्रचंड घोषणा दिल्या.उपविभागीय अधिकारी डॉ.मैनेक घोष,तहसीलदार गिरीश वाखारे हे मोर्चेेकर्‍यांसमोर येवून निवेदन स्वीकारले.त्यांनी अतिक्रमण धारकांना बजावलेल्या अपात्र दाव्यांचा नोटिसा मागे घेवून पुन्हा नवीन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.तथापि अतिक्रमण धारकांनी कागद पत्रांची पूर्तता करून द्यावी असे सूचित करून लवकरच कॅम्प लावण्याचे सांगितले.त्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला.यावेळी आ.राजेश पाडवी यांनी मार्गदर्शन केले होते.मोर्चात नागेश पाडवी,नगराध्यक्ष अजय परदेशी, पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे, शहराध्यक्ष योगेश चौधरी, किसान मोर्चाचे सरचिटणीस राजेंद्र राजपूत, जितेंद्र पाडवी,नारायण ठाकरे, बळीराम पाडवी,प्रकाश वळवी,प्रवीणसिंह गिरासे, यशवंत पाडवी,दिनेश खंडेलवाल,प्रदीप शेंडे,सतीश वळवी,दारासिंग वसावे,शिरीष माळी,सुरेश पाडवी, गोपी पावरा,गुड्डू वळवी,विरसिंग पाडवी,भय्या चौधरी सचिन गोसावी,रमेश पाटील,रसिलाबेन देसाई आदींसह मोठ्या संख्येत शेतकरी सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव नगरपंचायतिच्या 17 जागांसाठी दुपारी 1.30 वाजेपर्यंत 60.42 टक्के शांततेत मतदान

Next Post

धडगाव नगरपंचायतिच्या १७ जागांसाठी 79. 84 टक्के मतदान, मतदानात महिलांचे प्रमाण अधिक, मतदान प्रक्रिया शांततेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add