नंदुरबार l प्रतिनिधी
श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ कथा सप्ताहात काल भगवान श्रीकृष्ण व रुख्मिणीचा स्वयंवर विवाह वैदिक पध्दतीने लावण्यात आला. रुख्मिणी स्वयंवर ही संसाराची सप्तपदी असल्याचे भागवताचार्य प.पु.पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी सप्ताहाचे सातवे पुष्प गुंफतांना सांगितले. यावेळी स्वयंवर विवाहाचा उपस्थित भाविकांनी लाभ घेतला. तसेच आज दि.21 डिसेंबर रोजी कथा सप्ताहाची सांगता होणार आहे. या सप्ताहाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दैनिक नंददर्शन व चित्ते परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.
नंदुरबार येथील नंददर्शन व चित्ते परिवाराच्या वतीने स्व.जुलालसिंग बाजीराव राजपूत (जिभाऊ) व स्व.उषादेवी जुलालसिंग राजपूत यांच्या स्मरणार्थ गेल्या सात दिवसांपासून श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ कथा सप्ताह सुरु आहे. काल सोमवारी सप्ताहाचे सातवेे पुष्प भागवताचार्य प.पु.पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी रासक्रीडा, स्यमंतक मणी, श्रीकृष्ण रुख्मिणी विवाहावर गुंफले. यावेळी भगरेगुरुजी यांनी आपल्या निरुपणातुन स्वयंतक मणी, कंसचा वध आणि भगवान श्रीकृष्ण रुख्मिणीचा विवाह यावर निरुपन केले. ते म्हणाले की, रख्मिणी स्वयंवर विवाहाला एक आध्यात्मिका लाभलेली आहे. भगवान श्रीकृष्ण व रुख्मिणीचा विवाह हा स्वयंवर करण्यात आला. पुजेवेळी पुरोहितांना विशेष महत्व असते. कारण पुरोहितांच्या मंत्रोपचारातुन प्रभुंचे स्मरण होते. म्हणुन कोणतीही पुजाविधी करतांना पुरोहितांना प्राधान्य दिले जाते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी इच्छुक दांपत्यांना भगवान श्रीकृष्णास रुख्मीणीचे विधीवत शास्त्रोक्त मंत्रोपचारात कन्यादान करण्याचा लाभ देण्यात आला. तसेच श्रीकृष्ण भुमिकेत दिपाक्षी प्रल्हाद पटेल व रुख्मीणीच्या भुमिकेत जान्हवी जितेंद्रसिंग राजपूत यांनी वेषभुषा साकारली. श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची सांगता आज दि.21 रोजी होणार असून प.पु.पं.भगरे गुरुजी हे द्वारकाधीश लिला श्रीकृष्ण भागवत धर्म उपदेश, सुदामा भेट, निजधामगमन यावर आठवे पुष्प गुंफतील. या कथा सप्ताहाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नंददर्शन व चित्ते परिवाराकडुन चेतनसिंग जुलालसिंग राजपूत, कोमलसिंग जुलालसिंग राजपूत, जितेंद्रसिंग जुलालसिंग राजपूत, अभयसिंग जुलालसिंग राजपूत, दर्पण कोमलसिंग राजपूत, निलय चेतनसिंग राजपूत, स्वामी कोमलसिंग राजपूत, वरद जितेंद्रसिंग राजपूत, देव अभयसिंग राजपूत यांनी केले आहे.
आज सकाळी दहा वाजेपासून होणार कथा निरुपण नंददर्शन व चित्ते परिवाराच्यावतीने आयोजित केलेल्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहात गेल्या सात दिवसांपासून दररोज दुपारी 2 वाजेपासून कथेचे निरुपण झाले. तर आज 21 डिसेंबरला अखेरच्या दिवशी कथा सप्ताहाची सांगता असल्याने सकाळी 10 वाजेपासून प.पु.पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी हे कथेचे निरुपण करतील. सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत कथा होणार असून त्यानंतर महाप्रसादाने श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा समारोप होईल.








