नंदूरबार l प्रतिनिधी
परिवर्धा ता. शहादा येथील शेतकऱ्यांचा दि.20 डिसेंबर 2021 रोजी रात्री 12 च्या सुमारात अज्ञात माथेफिरुनी तब्बल 58 एकर वरील तोडणीस येणारा ऊस जाळला.यात शेतकऱ्यांचे 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परिवर्धा ता. शहादा येथील शेतकऱ्यांचा दि.20 डिसेंबर 2021 रोजी रात्री 12 च्या सुमारात अज्ञात माथेफिरुनी १० शेतकऱ्यांचा तब्बल 58 एकर वरील तोडणीस येणारा ऊस जाळल्याची घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेत जगन्नाथ पुरुषोत्तम पाटील परी 8 एकर, भगवान नथ्थु पाटील, परी 5 एकर,चुनिलाल दिलीप पाटील वर्धे 4 एकर, मोहन दगडु पाटील वर्धे 4 एकर, विजय सदाशिव पाटील वर्धे 4 एकर, गुलाल नरसई पाटील वर्धे 12 एकर + ठिबक संच, विलास त्र्यंबक पाटील वर्धे 6 एकर, डॉ.सुरेश गोविंद पाटील वर्धे ह.मु.लोणखेडा 5 एकर, राजाराम रोहिदास पाटील परी 5 एकर, मनोहर विठ्ठल पाटील परी 5 एकर असा एकुण 58 एकर ऊस रात्री 12 च्या सुमारात जळुन खाक झाला. विशेष म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या शेतात जाऊन माथेफिरुने ऊस जाळण्यात आला. यात रात्री जंगलची लाईट बंद होती. त्यामुळे विजेचा तार तुटणेचा काहीच संबंध नसल्याने हे बुद्धी पुरस्कर नियोजित कट असल्याचे प्रथमदर्शी दिसुन आले. यात शेतकऱ्यांचे 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
अत्यंत दुर्दैवी घटना
पोलिस प्रशासन शेतकऱ्यांसाठी नाहीत का ? त्या गाव शिवारात अश्या घटना नेहमीच घडतात. पोलिसांनाही गुन्हेगारांचे प्रमुख कोण आहेत ते माहीत आहे पण दरवेळी दुर्लक्ष करतात. पोलिस येतात, चौकशी करतात नंतर काहीच कार्यवाही होत नाही. असले कृत्य करणाऱ्या, पिकांचे नुकसान करणाऱ्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.








