नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील खामगाव शिवारात विद्युत वाहिनीवर आकडे टाकून सुमारे २३ हजाराची वीज चोरी केल्याप्रकरणी दोघां विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील खामगाव शिवारातील प्रविण वसंत जवेरी यांनीही विद्युत वाहिनीवर आकडा टाकून ४१४ युनिटची ११ हजार ८१० रुपये किंमतीची वीज चोरी केल्याचे आढळून आले.तसेच हर्षल संजय सोनार यांनी महावितरणच्या विद्युत वाहिनीवर २५ फुट काळ्या रंगाच्या वायरने आकडे टाकून ४१४ युनिटची ११ हजार ८१० रुपये किंमतीची वीज चोरी केली. दोघांनी एकूण २३ हजार ६२० रुपये किंमतीची वीज केल्याचे उघड झाले. याबाबत नंदुरबार ग्रामीण कक्षाचे सहाय्यक अभियंता राजीव गणेश रंजन यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दोघांविरूद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ प्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.










