Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे मान्यताप्राप्त टूर गाइडचे प्रशिक्षण

team by team
December 16, 2021
in राज्य
0

नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत स्थानिक प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटकांसाठी टूर गाइडची व्यवस्था करून या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या हेतून राज्यातील 14 पर्यटनस्थळी सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल गाइड) प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई- राठोड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.
या पर्यटनस्थळांमध्ये नाशिक शहर, अहमदनगर शहर, भंडारदरा (अहमदनगर), रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, अलिबाग, मुरुड, फलटण (सातारा), मुरबाड, जुन्नर (पुणे), सिंधुदुर्ग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (मुंबई उपनगर), औरंगाबाद, रत्नागिरी, लोणार (बुलडाणा) यांचा समावेश आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम व ट्रॅव्हल मॅनेजमेंट, ग्वाल्हेर तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ज्ञ प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतील. पाच दिवसांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यावर महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे प्रमाणपत्र व पुढे टूर गाइड म्हणून कामासाठी ओळखपत्र देण्यात येईल.

पात्रतेचे निकष असे : 18 वर्षांच्या पुढे, शिक्षण : वय वर्षे 40 खालील इच्छुकांसाठी किमान बारावी उत्तीर्ण, तर 40 वर्षांवरील इच्छुकांसाठी किमान दहावी उत्तीर्ण. फिरस्तीची आवड एका स्थिर करिअरमध्ये बदलण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी सुलभ मार्गदर्शक प्रशिक्षण उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.

इच्छुकांनी महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या https://www.maharashtratourism.gov.in/web/mh-tourism/certified-guide-traning या संकेतस्थळावर 31 डिसेंबर 2021 पूर्वी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गावातील गावठाणांचे होणार ड्रोनद्वारे सर्वेक्षण, पहिल्या टप्प्यासाठी अक्कलकुवा तालुक्याची निवड

Next Post

महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे कृषी पर्यटन धोरणांतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन

Next Post

महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे कृषी पर्यटन धोरणांतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add