Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गावातील गावठाणांचे होणार ड्रोनद्वारे सर्वेक्षण, पहिल्या टप्प्यासाठी अक्कलकुवा तालुक्याची निवड

team by team
December 16, 2021
in राज्य
0
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गावातील गावठाणांचे होणार ड्रोनद्वारे सर्वेक्षण, पहिल्या टप्प्यासाठी अक्कलकुवा तालुक्याची निवड

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य शासनाचा महसूल, ग्रामविकास, भूमी अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग, डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गावांतील गावठाणांचे ड्रोनद्वारे भूमापनाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक स्वाती लोंढे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.
राज्यातील सर्व गावांच्या गावठाणाचे सर्वेक्षण ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात गावठाण भूमापन न झालेल्या सर्व गावांचे गावठाण भूमापनाचे काम ड्रोनच्या साह्याने केले जाणार आहे. यासाठी अत्याधुनिक जीआयएस प्रणालीच्या आधारे गावांच्या गावठाणातील मिळकतीचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असून सर्वेक्षण झाल्यानंतर संगणीकृत नकाशे मिळकत पत्रिका तयार होईल.
या सर्वेक्षणामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शासनाच्या मालकीच्या मिळकतींचे संरक्षण, मिळकतींचा नकाशा व सीमा निश्चित होतील. तसेच मिळकतीचे नेमके क्षेत्र किती आहे त्याचीही नोंद होईल. ग्रामस्थाच्या नागरी हक्काचे संरक्षण होईल. गावातील रस्ते, शासनाच्या, ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सीमा निश्चित होऊन अतिक्रमण रोखता येईल. या सर्वेक्षणामुळे ग्रामपंचायतींना गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी अतिक्रमण निर्मूलनासाठी अभिलेख व नकाशे उपलब्ध होणार आहेत.
या योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील गावांचे ड्रोनद्वारे गावठाण भूमापन मोजणीचे काम प्रत्यक्षपणे सुरु करण्यात येईल.

जिल्ह्यातील महसुली गावांची संख्या- 962
नगर भूमापन योजना लागू झालेल्या गावांची संख्या- 80
स.न./ग.न/ गावठाण, पुर्नवसन, फॉरेस्ट जमिनीवर पुर्नवसन, छावणी गाव नकाशात गावठाण नसलेली गावांची संख्या -391
ड्रोन गावठाण सर्वेक्षण भूमापनासाठी पात्र 491 गावांची संख्या अशी : नंदुरबार 136, नवापूर 103, शहादा 134, तळोदा 73, अक्कलकुवा 44 तर अक्राणी 1.

बातमी शेअर करा
Previous Post

धनगर समाजातील विदयार्थ्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करावे

Next Post

महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे मान्यताप्राप्त टूर गाइडचे प्रशिक्षण

Next Post

महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे मान्यताप्राप्त टूर गाइडचे प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add