Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धनगर समाजातील विदयार्थ्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करावे

team by team
December 16, 2021
in राज्य
0

नंदुरबार l प्रतिनिधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सन 2021-2022 या आर्थिक वर्षांसाठी धनगर समाजातील भटक्या जमाती क प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करावे. असे आवाहन सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.

धनगर समाजातील भटक्या जमाती -क प्रवर्गातील विद्यार्थ्यांना निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी धनगर समाजातील विद्यार्थ्यांना ‘पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम’ योजना लागू केली आहे.या योजनेंअंतर्गत जिल्ह्याच्या ठिकाणी बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 25 हजार रुपये भोजन रक्कम, 12 हजार रुपये निवास भत्ता, 6 हजार रुपये निर्वाह भत्ता, अशी एकूण 43 हजार रुपये वार्षिंक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट वितरीत करण्यात येणार आहे.

योजनेसाठी शैक्षणिक निकष व पात्रता पुढील प्रमाणे: विद्यार्थी हा धनगर समाजाचा असावा, अर्जासोबत जात वैद्यता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असेल, विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाख पेक्षा जास्त नसावे, तसेच केंद्र शासनामार्फत ज्या वेळी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल. त्यानुसार या योजनेसाठी पालकांची वार्षिंक उत्पन्न मर्यादा अनुज्ञेय राहील. योजनेसाठी विद्यार्थ्यांचा स्वत:चा आधार क्रमांक राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न असावा. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे. अशा शहरातील विद्यार्थी रहिवाशी नसावा. शैक्षणिक निकषानुसार विद्यार्थी बारावी नंतरचे उत्तच शिक्षण घेत असावा. बारावीत किमान 60 टक्के गुण मिळालेले असावे. विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती 60 टक्के असणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. एका विद्यार्थ्यांस जास्तीत जास्त 5 वर्ष योजनेचा लाभ घेता येईल. निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. मात्र विद्यार्थ्यांस प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षांपेक्षा अधिक नसावे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, टोकरतलाव रोड,नंदुरबार येथे संपर्क साधावा.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची त्रैमासिक बैठक 21 डिसेंबर रोजी

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गावातील गावठाणांचे होणार ड्रोनद्वारे सर्वेक्षण, पहिल्या टप्प्यासाठी अक्कलकुवा तालुक्याची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add